हा घ्या पुरावा ! प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती ? पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे !! जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला !!! क्रियाशील कोण आमदार आहेत ? सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस
निसाका, रासाका बनकराच्या  पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य  सिद्धार्थ वनारसे
पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत  आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे !
परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती  ??
आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड !!
नासिक::- निफाड तालुक्यात सध्या  पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका  बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून  हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा   बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या  विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा,   "सब्र का फल मीठा होता है" अशा शब्दांत टिकाकारांना   चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना  नऊ महिनेच झाले आहेत, आमदार पदाची सुत्रे हाती घेऊन  निसाकाबाबत आमदार पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून  आजतागायत व पुर्वीही काय करत होते याचा पुरावाच‌ सादर केल्याने आता विरोधक काय भूमिका मांडतात याकडे ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे लक्ष लागले आहेत !!
  सिध्दार्थ वनारसे नी न्यूज मसालाशी बोलताना सांगितले की निफाड सहकारी साखर कारखाना अवसायानात निघून नासिक  जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे, संबंधित जमीन क्षेत्र डायपोर्ट करिता जेएनपीटी मुंबई यांना हस्तांतर करण्याबाबत आमदार दिलीप बनकर यांनी १३ मार्च २०२०  रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सिन्नर आमदार माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव वित्तीय सुधारणा राजगोपाल देवरा, उपजिल्हाधिकारी निलेश सागर, सहाय्यक प्रबंधक जेएनपीटी राजीव जोशी, साखर आयुक्त पुणे उत्तम इंदलवकर, साखर सहआयुक्त बाजीराव शिंदे, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, उपसचिव साखर संघ, संतोष घाडगे, आदींच्या उपस्थितीत विधान भवनात आमदार बनकरांनी निफाड सहकारी साखर कारखाना व रानवड सहकारी साखर कारखान्याच्या बाबत बैठक आयोजित केली होती, या बैठकीमध्ये निफाड कारखान्यावरील कर्ज रक्कम वसूल करण्याकरिता नाशिक जिल्हा सहकारी बँकेने सरफेसी कायदा २००२ अंतर्गत निफाड कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेतलेली असल्याने या कारखान्याच्या एकूण जमिनी पैकी काही जमीनीचे  क्षेत्र जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई अर्थात जे एन पी टी या संस्थेने अधिग्रहित करण्याची दोन्ही संस्थांनी मान्यता दिली असल्याने जमिनीचे मूल्य निश्चित केलेले आहे, त्यानुसार साखर  कारखान्याची जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेली जमीन जे एन पी टी ला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे, कारखान्याच्या सदर जमिनीवर बँकेचा बोजा व विक्रीकर विभागाचाही बोजा असल्याने विक्रीकर विभागाचा बोजा कमी करून जे एन पी टी ला सदर जमीन हस्तांतरित करता यावी तसेच विक्रीकर विभागाची ७२कोटी२६ लाख रुपयांची मागणी पैकी मुद्दल ३६ कोटी ५४ लाख रुपये व व्याज ३५ कोटी ७२ लाख रुपये असल्याने आमदार बनकरांनी व्याजाची रक्कम माफ झाल्यास जेएनपीटी कडून येणाऱ्या रकमेतून विक्रीकर भरणा शक्य होणार असल्याचे आपले मत मांडत सदर बाब मंत्री महोदय व अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना निफाड विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी निफाडकरांना निसाका व रासाका  सुरु  करण्या  बाबत शब्द दिला असून आमदार दिलीप बनकर यांना सहकार्य करण्याचे आदेश वजा सूचना देत निसाका बाबत कारवाई करण्याचे सदर बैठकीत सांगितले.  तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभागाने निफाड सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीच्या दराबाबत फेर मूल्यांकन एक एप्रिल नंतर करण्याचे आदेशही अजित पवारांनी दिले होते, जेएनपीटी नी सदर प्रस्तावा बाबत सकारात्मक निर्णय घेऊन विक्रीकर विभागाच्या थकबाकी संदर्भातील व्याजाच्या सवलतीसाठी निसाका, नासिक जिल्हा बँक, व  आमदार दिलीप बनकर यांनी वित्त विभागास‌ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश काढले होते, परंतु वैश्विक कोरोना रुपी महासंकटात लाॅकडाऊनमुळे २२ मार्च पासून जे काम मंत्रालयातील प्रशासकीय काम थांबले ते आजतागायत, तरीही आमदार बनकरांनी  आपला संपर्क संबंधित प्रशासनातील अधिकारी व उपमुख्यमंत्री, व सहकार मंत्री यांच्याशी ठेवत निसाका व रासाका साठी प्रयत्न सुरूच ठेवले. आमदार बनकरांनी  विधानभवनात आमदारकीची शपथ घेतली आणि निफाड तालुक्यातील जनतेला , ऊस उत्पादकांना, कामगारांना जो शब्द दिला होता, त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली असताना उगीचच फक्त नऊ महिने आमदारकीचा कार्यकाळ मार्गी लावत असताना त्यात चार ते पाच  महिने कोरोनाच्या संकटात गेले,  मिशन निसाका व रासाका व खाजगी  केजीएस  कारखाने  कसे सुरू करता येतील यासाठी आमदार बनकर यांचे निवडून आल्यापासून प्रयत्न सुरू असताना फक्त बनकर यांना टीकेचे लक्ष्य करण्यासाठी राजकीय विरोधक ऊस उत्पादक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, विरोधकांनी कितीही टीका केली तरी निसाका रासाकासह केजीएस या खाजगी कारखान्याचा प्रश्न बनकर मार्गी लावल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत, गोदा घाट परिसरातील ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचे काम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. असा आत्मविश्वास जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी केला आहे तसेच जनतेला समजण्यासाठी त्यांनी काही पुरावे आमदार  बनकर यांनी केलेल्या मंत्रालयातील पाठपुराव्याचे जनतेपुढे सादर केले आहेत.
************************************
        याआधी तत्कालीन कालावधी २००४ ते २००९ च्या आमदारकीच्या कार्य काळात नांदूरमध्यमेश्वर धरणा साठी ८ गेट उभे केले होते व गोदाकाठाचा काही प्रमाणावर पुराचा धोका कमी केला होता, आणि आताही राहिलेल्या ८ गेटच्या कामासाठी करोडोचा निधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कडून मंजूर करून आणला, निफाड विधानसभा नाव असूनही कायम उपेक्षित असलेल्या निफाड शहरासाठी पाच कोटीचा घवघवीत निधी तालुक्यातील रस्त्यांसाठी आणला.
***************************************




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !