पोस्ट्स

श्री.आपासो.देवरे विद्यालयात लेझीम पथकासह शिवजयंती उत्साहात साजरी !

इमेज
श्री.आपासो.देवरे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी खोंडामळी(प्रतिनिधी)::- श्री.आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विदयालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे दाखले देत रयतेच्या कल्याणासाठी झटणारा एकमेव राजाची गाथा स्पष्ट केली. विद्यार्थीनींनी लेझीम पथकाचे संचलन करून गावकऱ्यांचे लक्ष वेधले.    या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक एम.डी.नेरकर, वार.डी.बागुल, आर.एम.पाटील, एस.जी.पाटील, श्रीम.एम.आर.भामरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डी.बी.भारती यांनी केले. तसेच कार्यक्रमाला विखरण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी दिली वारली चित्रशैलीतज्ञ देवधर यांच्या निवासस्थानी भेट

इमेज
वारली चित्रकला हा मराठी मातीचा कलात्मक वारसा !            नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी वारली चित्रकला साधीसुधी, सहजसोपी असते. ही चित्रे बघताना आपल्याला सात्विक आनंद मिळतो. माझ्या मुलीच्या लग्नात वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविराज भांगरे यांनी सुंदर वारली चित्र रंगवले. त्यासाठी पारंपरिक झोपडी तयार करून घेतली. त्यातून मराठी मातीचा कलात्मक वारसा जोपासला. आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वारली कला जाणून घेत कलेचा आनंद घेतला. असा अनुभव विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी व्यक्त केला.    शनिवारी, छत्रपती शिवजयंतीच्या दिवशी सकाळी डॉ. बी. जी. शेखर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांचे स्वागत सौ. सुचित्रा देवधर  यांनी केले.  सुप्रिया देवधर हिने अलीकडेच भिंतीवर रंगवलेल्या वारली चित्राची माहिती दिली. संजय देवधर यांनी  विविध वारली चित्रे दाखवून त्यांची वारली चित्रसृष्टी व वारली आर्ट वर्ल्ड ही पुस्तके भेट दिली. शेखर साहेबांनी कलेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. लवकरच पोलिस कुटुंबीयांस

जिल्हाधिकारी यांचे अभिवादन !

इमेज
जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन !! नासिक:- जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मे. सूरज मांढरे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत शिवजयंती उत्साहात साजरी !

इमेज
         नाशिक : जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली, जिल्हा परिषद प्रांगणातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे(सा.प्र.वि.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बाच्छाव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

पुस्तक परीक्षण. भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध ! सविस्तर परीक्षण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
पुस्तक परीक्षण भौगोलिक पत्रकारितेचा सांगोपांग वेध      "वृत्तपत्रविद्या हे सतत गतिमान होत जाणारे  निरंतर  परिवर्तनशील शास्त्र आहे. सध्याच्या वेगवान युगात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण याप्रमाणेच भौगोलिक पत्रकारितेचे शास्त्रीय कौशल्य विकसित होत आहे. त्यात प्रगत वार्तांकन आणि लेखन कौशल्याचा समावेश होतो. मानवाने निसर्गाशी साधलेल्या सुसंवादातून व संघर्षातून निर्माण झालेल्या या क्षेत्राचे सोपे वर्णन 'भू - पत्रकारिता' असे करता येईल. भूगोल व पत्रकारिता हे दोन विषय शिकविणाऱ्या प्रा. डॉ. एम. जी. कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संशोधनपर प्रबंध सादर केला. त्याचेच 'भू- पत्रकारिता' हे पुस्तक ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या हस्ते प्रकाशित झाले, हा मी माझा बहुमान समजतो. अभ्यासप्रवृत्त करणारे हे पुस्तक तरुण पत्रकारांना नवी दिशा, नेमका दृष्टिकोन देईल.                    प्रा.डॉ. एम.जी. कुलकर्णी हे अतिशय अभ्यासू व संशोधक वृत्ती असणारे व्यक्तिमत्त्व आहे. एच.पी. टी. महाविद्यालयात भूगोल विषयाचे त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. नंतरच्या

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! न्यूज मसाला वृत्तसेवा 7387333801 नाशिक ( प्रतिनिधी )  प्रा. सुनिल देवधर मितभाषी पण मिश्किल व्यक्तिमत्व होते. वृत्तीने ते कुटुंबवत्सल होते. उत्स्फूर्त काव्यातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे. त्यांचे निर्मळ मन त्यात कायमच प्रतिबिंबित झाले. ते शरीराने आपल्यात नसले तरी निर्झर काव्य संग्रहातून हा काव्यनिर्झर कायम झुळझुळत राहील असे प्रतिपादन प्रा. अनंत येवलेकर यांनी केले.       कै. प्रा. सुनिल देवधर यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने काल ' निर्झर ' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ मोजक्या ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार संजय देवधर, प्रा. संजय चपळगावकर, शरद वर्तक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती शुभांगी देवधर यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यावर सुनिल यांचे कविता संग्रह पूर्ण व्हावा हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

कै. प्रा. सुनील देवधर यांचा काव्यनिर्झर झुळझुळत राहील ! नाशिक ( प्रतिनिधी )  प्रा. सुनिल देवधर मितभाषी पण मिश्किल व्यक्तिमत्व होते. वृत्तीने ते कुटुंबवत्सल होते. उत्स्फूर्त काव्यातून ते सातत्याने व्यक्त व्हायचे. त्यांचे निर्मळ मन त्यात कायमच प्रतिबिंबित झाले. ते शरीराने आपल्यात नसले तरी निर्झर काव्य संग्रहातून हा काव्यनिर्झर कायम झुळझुळत राहील असे प्रतिपादन प्रा. अनंत येवलेकर यांनी केले.       कै. प्रा. सुनिल देवधर यांच्या प्रथम जयंतीच्या औचित्याने काल ' निर्झर ' या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात हा समारंभ मोजक्या ५० निमंत्रितांच्या उपस्थितीत झाला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, पत्रकार संजय देवधर, प्रा. संजय चपळगावकर, शरद वर्तक व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक श्रीमती शुभांगी देवधर यांनी केले. सेवानिवृत्त झाल्यावर सुनिल यांचे कविता संग्रह पूर्ण व्हावा हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व निर्मळ