जिल्हा परिषदेत शिवजयंती उत्साहात साजरी !
         नाशिक : जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी करण्यात आली, जिल्हा परिषद प्रांगणातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे(सा.प्र.वि.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बाच्छाव, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने शिवरायांना मानवंदना देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!