विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी दिली वारली चित्रशैलीतज्ञ देवधर यांच्या निवासस्थानी भेट




वारली चित्रकला हा मराठी मातीचा कलात्मक वारसा !

           नाशिक ( प्रतिनिधी ) आदिवासी वारली चित्रकला साधीसुधी, सहजसोपी असते. ही चित्रे बघताना आपल्याला सात्विक आनंद मिळतो. माझ्या मुलीच्या लग्नात वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविराज भांगरे यांनी सुंदर वारली चित्र रंगवले. त्यासाठी पारंपरिक झोपडी तयार करून घेतली. त्यातून मराठी मातीचा कलात्मक वारसा जोपासला. आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वारली कला जाणून घेत कलेचा आनंद घेतला. असा अनुभव विशेष पोलिस महासंचालक डॉ. बी.जी. शेखर यांनी व्यक्त केला.
   शनिवारी, छत्रपती शिवजयंतीच्या दिवशी सकाळी डॉ. बी. जी. शेखर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैली तज्ज्ञ संजय देवधर यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांचे स्वागत सौ. सुचित्रा देवधर  यांनी केले.  सुप्रिया देवधर हिने अलीकडेच भिंतीवर रंगवलेल्या वारली चित्राची माहिती दिली. संजय देवधर यांनी  विविध वारली चित्रे दाखवून त्यांची वारली चित्रसृष्टी व वारली आर्ट वर्ल्ड ही पुस्तके भेट दिली. शेखर साहेबांनी कलेचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. लवकरच पोलिस कुटुंबीयांसाठी वारली चित्र कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त करतानाच आपण त्यातले पहिले प्रशिक्षणार्थी असू असेही जाहीर केले. यावेळी प्रसिद्ध उद्योजक धनंजय बेळे व सहकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।