पोस्ट्स

मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक होण्यासाठी आवाहन !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जोगेश्वरी पूर्व मेघवाडी येथे "मराठा सामाजिक संस्थेच्या" वतीने मराठा पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 'विषय गंभीर तिथे मराठा खंबीर' या उक्तीप्रमाणे मराठा समाजानेही जुन्या चालीरीती संस्कृती परंपरेत न अडकता गुजराती मारवाडी सिंधी लोकांप्रमाणे उद्योगात यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी "रिस्क" ही घेतलीच पाहिजे. शिवरायांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते तसेच आता त्यांचीच विचारधारा पुढे चालवत उद्योगक्षेत्रात जिद्दीनं उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीत मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव सुर्वे, उपाध्यक्ष सुहास तावडे, कार्यवाहक संदीप भोसले, अश्विनीताई भोसले, कैलास येरुणकर, साक्षीताई घोसाळकर, उद्योग आणि सहकार विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल कदम यांनी नवउद्योग करणाऱ्य

"मुंबईकर" महाराष्ट्रदिनी आपल्या भेटीला ! मी मुंबईकर... मै मुंबईकर... दुनिया में कोई नहीं मुझसे बेहतर… हालात हों जैसे भी मै सिकंदर... !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक    ‘मुंबईकर’ महाराष्ट्रदिनी मुंबईकरांच्या भेटीला !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : 'मुंबईकर’ ही मुंबईत राहणार्‍या माणसाला अभिमानास्पद अशी पदवीच वाटते. सार्‍या भारतातच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी ही ओळख ठळकपणे आपलं अस्तित्व दाखवते. मुंबईचं श्रीमंतीचं, ग्लॅमरचं वलय आपसुक मिळत असलं तरी, मुंबईकर हा माणूस म्हणून स्वतःची वेगळी ओळख असलेला आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं वर्णन करणाऱ्या ‘मुंबईकर’ या हिंदी गाण्याचा म्युझिक व्हिडिओ १ मे या महाराष्ट्रदिनी रसिकांसमोर मिथिलेश पाटणकर या यूट्यूब चॅनेलवर आणि ऑडिओ इतर सर्व प्रमुख ऑडिओ प्लॅटफॅार्मस् वर प्रसिद्ध होत आहे.           या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार डॉ. प्रमोद बेजकर आहेत. मिथिलेश विश्वास पाटणकर यांनी या गाण्याचं संगीत संयोजन आणि गायन केलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, यात एक रॅप गाण्याचा भाग आहे, जो मिथिलेश यांनीच लिहिला असून, एका वेगळ्याच शैलीदार आवाजात गायला आहे. या गाण्याच्या व्हिडिओत, मुंबईची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली अनेक स्थळं पहायला मिळतील. तसंच मुंबईत विविध व्यवसाय करणारे देखिल आपण

ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक   ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबिराचे यशस्वी आयोजन !             नासिक::-ब्रम्हाकुमारीज् संस्थेच्या मुल्य शिक्षण ह्या विभागाद्वारे गंगापूर रोड नासिक येथील कॉमर्स मैनेजमेंट कम्प्युटर सायन्स कॉलेज येथे विद्यार्थांसाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर पाच दिवसीय कोर्स चे आयोजन करण्यात आले होते.          ब्रम्हाकुमारीज् संस्थेचे विकास साळुंके व प्राध्यापक सतिश भदाणे यांनी ब्रम्हाकुमारी वासंती दिदीजींच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे, प्राध्यापिका डॉ. वावीकर यांनी सहकार्य केले.           ब्रम्हाकुमारीज् गंगापूर रोड सेवा केंद्र संचालिका मनिषा दिदी यांनी विद्यार्थ्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन करताना, सकारात्मक विचार, इमोशनल स्टॅबिलिटी, निर्णय शक्ती व एकाग्रता वाढवण्यासाठी टिप्स देताना विद्यार्थ्यांना गाईडेड मेडिटेशन चा अनुभव करवला. सोनी तर्वे यांनी गीतगायन केले. सुरेश साळुंके, तृप्ती देवरे, सतिश भदाणे, विकास साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास याविषयी सकारात्मक मार

मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक  मुंबई दूरदर्शन च्या वतीने प्रेक्षकांना 'शब्दसूरांचा जादूगार संगीतकार,,,,,,," या लघुपटाची दि. ६ व ७ मे रोजी अनोखी भेट ! `संगीतकार अशोक पत्की' लघुपटाचे दूरदर्शनवर ६ व ७ मे रोजी प्रसारण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई दूरदर्शनच्या वतीने `शब्दसूरांचा जादूगार संगीतकार अशोक पत्की' या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्याचे प्रसारण शुक्रवार दिनांक ६ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता आणि शनिवार दिनांक ७ मे रोजी दुपारी १.३० व रात्री १०.३० वाजता होईल. दूरदर्शनच्या माजी सहाय्यक संचालक निर्मात्या डॉ. किरण चित्रे यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यासाठी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक नीरज आगरवाल यांचे सहकार्य मिळाले आहे.          अशोक पत्की हे संगीत विश्वातलं मोठं नाव, शास्त्रशुद्ध पद्धतीने संगीताचे शिक्षण न घेताही स्वकर्तृत्वाच्या बळावर त्यांनी संगीत क्षेत्रात अफाट आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या सांगितिक जीवनाची यशोगाथा रसिकांसमोर यावी, यासाठी या लघुपटाचे संकलन प्रफुल्ल मोहिते यांनी केले आहे तर संकलन प्रमुख शुभांगी सावंत यांनी समन्वयकाची जबाबदारी

पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द ! माझा कार प्रवास !!

इमेज
पर्यटनाची मार्गदर्शक 'कार' कीर्द !                 (पुस्तक परीक्षण)    पर्यटनाचे महत्त्व समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात देखील सांगितले आहे. सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटनाचा चांगला उपयोग होतो. देशाच्या विविध भागातील संस्कृती, इतिहास, निसर्ग सौंदर्य, तेथील जीवनशैली, खाद्यविशेष यांची पर्यटनामुळेच ओळख होते. पर्यटन केवळ मौजमजा, विरंगुळा, मनोरंजन इतक्यापुरतेच मर्यादित नाही. आपल्या भारतात विविधतेतली एकता बघायला मिळते. गड-कोट, मंदिरे, लेणी, समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे अशा अनेक ठिकाणी पर्यटकांची कायम गर्दी असते. साहसी पर्यटन देखील केले जाते. आपल्या आनंदासाठी कारने प्रवास करणाऱ्या पर्यटकांना ' माझा कार प्रवास ' हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.     अमरावतीचे विजय पाटणे पर्यटनप्रेमी आहेत. त्यांनी कारमधून प्रवास करून महाराष्ट्रासह बव्हंशी सारा देश पिंजून काढला. शेजारच्या नेपाळलाही ते कारने प्रवास करूनच भेट देऊन आले. 'माझा कार प्रवास' या पुस्तकामधले या सर्व भटकंतीचे वर्णन वाचताना वाचकांना नक्कीच प्रवासाची अनुभूती मिळेल. 'बीएसएनएल'मध्ये उपविभागीय अभियंता पदावरू

राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण ! या दोन ग्रामपंचायतींचा होणार गौरव !

इमेज
राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण !     पंचायती राज दिनी ग्रामसभांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेबिनारद्वारे करणार मार्गदर्शन !           नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी व  दरी ता. नाशिक यांचा होणार गौरव बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना होणार वितरित.          नाशिक - २४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहेत. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.       देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:०० वा. नियोजित राष्ट्र

कामकाजात अनियमितता व दोषारोप सिद्ध झाल्याने दोन ग्रामसेवकांचे निलंबन !

इमेज
कामकाजात अनियमितता : दोन ग्रामसेवक निलंबित ! दोषारोप सिद्ध झाल्याने केले निलंबन ! नाशिक - जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती लीना बनसोड यांनी ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथील ग्रामसेवक पांडुरंग जाणु खरपडे यांना १० दोषारोपावरुन व ग्रामपंचायत कोमलवाडी, ता. सिन्नर येथील ग्रामसेवक राजेंद्र भाऊराव निकम यांना ०३ दोषारोपावरुन निलंबित केले आहे.           पांडुरंग जाणु खरपडे हे ग्रामपंचायत कोटंबी (ह), ता. त्र्यंबकेश्वर येथे कार्यरत असुन त्यांच्याविरुध्द कार्यालयीन कामकाजाबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार अर्ज सादर केलेले होते. त्यानुसार आर. आर. बोडके प्रशासक यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २१ व १२ जानेवारी २२ रोजी भेट दिली असता खरपडे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच खरपडे वारंवार अनधिकृत गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय दाखले वेळेत न मिळणे, ग्रामस्थांना पाणी न मिळणे, कोटंबी हे गांव आदिवासी क्षेत्रात येत असुन पेसा व इतर आदिवासी योजनांपासुन गावास वंचित ठेवणे, ग्रामसभा न घेणे, पाणी शुध्दीकरणासाठी टीसीएल पावडर संपल्यानंतर नवीन साठा उपलब्ध करुन न देणे, गावांत ३

शाश्वत विकासाचा संकल्प,. गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ !

इमेज
ग्रामपंचायतींकडून शाश्वत विकासाचा संकल्प पंचायत राज दिनी ग्रामसभेत होणार ठराव : गरिबीचे उच्चाटन, पृथ्वीच्या रक्षणाची शपथ नाशिक : गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीच्या रक्षण करणे आणि २०३० पर्यंत सर्व नागरिकांना शांतता व समृध्दी प्राप्त करून देणे, यासाठी पंचायत राज संस्था कटिबध्द असून येत्या  २४ एप्रिल २०२२ रोजी प्रत्येक ग्रामपंचायत शाश्वत विकासाचा संकल्प सोडणार आहे, तसेच केंद्र सरकारच्या व्हायब्रंट ग्रामसभा पोर्टल डॅशबोर्ड वर याबाबतची माहिती प्रसिध्द केली जाणार आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत केंद्र शासनाने नव्याने सुधारणा केली आहे त्यानुसार सन २०२२-२३ पासून शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायत राज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. शाश्वत विकासाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्र संघाने जी ध्येये निश्चित केली आहेत, ती साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या १७ पैकी ९ संकल्पना / विषय (Themes) केंद्र शासनाने निश्चित केल्या आहेत. *******************************         या संकल्पना खालील प्रमाणे : 

अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. च्या अध्यक्षपदी निवड !

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,.                                     डॉ. अनिल आव्हाड यांची आय. एम. ए. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी विभागातील सुप्रसिद्ध डॉ. अनिल आव्हाड यांची इंडियन मेडिकल असोसिएशन, मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई हाजीअली येथील "आय एम ए हाऊस" येथे संपन्न झाला. आय एम ए दिल्लीचे सेक्रेटरी जनरल डॉ. जयेश लेले हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आय एम ए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.  अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल आव्हाड यांनी त्यांच्या पुढील वर्षातील योजनांबद्दल माहिती दिली. वैद्यकीय व्यावसायिकांची जनमानसातील प्रतिमा उंचावणे, डॉक्टरांचे वैयक्तिक आरोग्य व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचे महत्त्व ओळखून ते उत्तम राखण्यासाठी नवीन योजना आखणे, डॉक्टरांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करणे; ज्यामध्ये वेगवेगळे खेळ, संगीत आणि पर्यटन याचा समावेश असेल असे विविध कार्यक्रम राबविण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?" (१२ एप्रिल)वजनदार हास्यकवी अर्थातकविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !

इमेज
माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?"    (१२ एप्रिल) वजनदार हास्यकवी अर्थात कविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !                                                     १२ एप्रिल, आपल्या विनोदी काव्यरचनांनी रसिकांना रिझविणारे हिंदी हास्यकवी प्रदीप चौबे यांचा तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षापूर्वी १२ एप्रिलला चौबे यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ७१ व्या वर्षी ग्वालियर येथे निधन झाले होते. २६ ऑगस्ट १९४९ ला महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे जन्मलेल्या आणि नंतर ग्वालियर येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चौबे अखिल भारतीय हिंदी कविसंमेलनाचे बेताज बादशहा होते. व्यंगकार, कवि आणि गीतकार प्रदीप चौबे  आपल्या हास्य कवितांना नेहमीच टीकात्मकतेची जोड देऊन तत्कालीन परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करायचे. हिंदी हास्य कविसंमेलनांचा फड गाजवणारे कवी प्रदीप चौबेंना चाहत्यांचे अलोट प्रेम लाभले होते. ते काव्य मैफिलीत नेहमीच हास्याची कारंजी उडवत असत. त्यांच्याशिवाय कोणतेह