माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?" (१२ एप्रिल)वजनदार हास्यकवी अर्थातकविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !

माॅ का दूध तो सभीं ने सुना होगा लेकीन "बाप का दूध" प्रस्तूत करणारे, "शव यात्रा पर हास्य कविताएं" ऐकवणारे जेव्हा दुकानदाराला विचारतात "अंडे कैसे दिये ?"
   (१२ एप्रिल)
वजनदार हास्यकवी अर्थात
कविसंमेलनाचे फड गाजवणारे कवि प्रदीप चौबे यांचा स्मृतिदिन !

                                           
        १२ एप्रिल, आपल्या विनोदी काव्यरचनांनी रसिकांना रिझविणारे हिंदी हास्यकवी प्रदीप चौबे यांचा तिसरा स्मृतिदिन. तीन वर्षापूर्वी १२ एप्रिलला चौबे यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ७१ व्या वर्षी ग्वालियर येथे निधन झाले होते. २६ ऑगस्ट १९४९ ला महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे जन्मलेल्या आणि नंतर ग्वालियर येथे वास्तव्यास असलेले प्रदीप चौबे अखिल भारतीय हिंदी कविसंमेलनाचे बेताज बादशहा होते. व्यंगकार, कवि आणि गीतकार प्रदीप चौबे  आपल्या हास्य कवितांना नेहमीच टीकात्मकतेची जोड देऊन तत्कालीन परिस्थितीवर व्यंगात्मक भाष्य करायचे. हिंदी हास्य कविसंमेलनांचा फड गाजवणारे कवी प्रदीप चौबेंना चाहत्यांचे अलोट प्रेम लाभले होते. ते काव्य मैफिलीत नेहमीच हास्याची कारंजी उडवत असत. त्यांच्याशिवाय कोणतेही कविसंमेलन अपूर्ण वाटत असे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते, जेवढे ते लोकांना हसवायचे तेवढेच ते आतून दु:खी होते. त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. जेव्हा ते आपल्या रचना सादर करायचे तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडत. ते आपल्या  हास्यकवितांमधून परंपरावादी मानसिकतेवर प्रहार करीत. त्यांच्या रचना आणि सादरीकरणाच्या खास लकबीने  श्रोत्यांची हसून हसून मुरकुंडी वळत असे. ते अखंड हास्याचा स्त्रोत होते. त्यांना कवी संमेलनामध्ये हास्याचा ‘छोटा सिलेंडर’ संबोधले जायचे. काही काळ ते देना बँकेचे कर्मचारी होते. तथापि, व्यस्ततेमुळे स्वेच्छानिवृत्ती घेणारे चौबे आपल्या नोकरीवरही हास्य-व्यंग करीत. जेव्हा त्यांना ‘नोकरी कुठे करता’  असे कुणी विचारले तर ते म्हणायचे "देना बँक में, वहां देना ही देना होता है।"  त्यांचा प्रतिगीत (पैरोडी) हा काव्यप्रकार आणि व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या रचना फारच लोकप्रिय ठरल्या. रेल्वेप्रवासावरील त्यांची काव्यरचना 'रेलमपेल' फारच गाजली. त्यांचे 'हल्के-फुल्के', 'बाप-रे-बाप', 'बेस्ट ऑफ प्रदीप चौबे', 'बहुत प्यासा है पानी', 'खुदा गायब है',  'आलपिन', 'चले जा रहे हैं' आदी प्रमुख काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रदीप चौबेंना 'काका हाथरसी’  पुरस्कारा बरोबरच माजी राष्ट्रपति डॉ़. शंकरदयाल शर्मा यांनी  'लोकप्रिय हास्य-कवि'  म्हणून सन्मानित केले होते.  त्यांनी दूरचित्रवाहिनी वरील ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये उपस्थित राहून आपल्या खास शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले होते. यानिमित्ताने त्यांच्या बाबतीत  ‘जिन्हें कभी हंसाया था, उन सभी को रुला गए’ एवढेच  म्हणता येईल.                                                                             प्रा. विजय कोष्टी, 
कवठे महांकाळ (सांगली)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।