राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण ! या दोन ग्रामपंचायतींचा होणार गौरव !

राष्ट्रीय पंचायती राज दिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण !
    पंचायती राज दिनी ग्रामसभांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेबिनारद्वारे करणार मार्गदर्शन ! 
         नाशिक जिल्ह्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती मोडाळे ता.इगतपुरी व  दरी ता. नाशिक यांचा होणार गौरव
बक्षिसाची रक्कम PFMS द्वारे थेट ग्रामपंचायतींना होणार वितरित.


         नाशिक - २४ एप्रिल हा दिवस देशपातळीवर पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा आयोजन करण्यात येणार असून राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री देशातील सर्व नागरिकांना वेबिनारद्वारे संबोधित करणार आहेत. या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था व ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
      देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या पंचायती राज दिवस कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीस ऑनलाईन पद्धतीने नोंदणी आवश्यक असल्याने खालील वेब लिंक नोंदणी करावी आणि २४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२:०० वा. नियोजित राष्ट्रीय पंचायती राज दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी यांनी केले आहे.
लिंक - https://pmevents.ncog.gov.in/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!