पोस्ट्स

राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त नोव्हेंबर मध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन !

इमेज
राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त नोव्हेंबर मध्ये दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन !          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात दोन दिवसीय ‘मुंबई शहर ग्रंथोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी प्राथमिक आढावा बैठक घेतली.            मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ साठी जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, शिक्षण उपनिरीक्षक रंजना राव, मनपा शिक्षक ग्रंथालयांच्या ग्रंथपाल साधना कुदळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे प्रतिनिधी अशोक मुळे, बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद खानोलकर, प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे, कार्यवाह सुनिल कुबल, कार्यवाह उमा नाबर आदी उपस्थित होते.            जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.        या महोत्सव

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले रेकॉर्ड वर्गीकरण करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्याचे अभिनंदन !

इमेज
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले रेकॉर्ड वर्गीकरण करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्याचे अभिनंदन !        नाशिक::- जिल्हा परिषदेत नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर कार्यरत झालेल्या श्रीमती आमिशा मित्तल ( आयएएस) यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान व रेकॉर्ड वर्गीकरण मोहीम करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार येवला तालुक्यातील पंचायत समिती येवला येथे सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहीम व रेकॉर्ड वर्गीकरणाचे कामकाज केले. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे वरिष्ठ सहाय्यक कैलास पुंडलिक आरखडे, शिक्षण विभाग पंचायत समिती येवला हे एका हाताने पूर्णतः अपंग कर्मचारी असून देखील त्यांनी रेकॉर्ड वर्गीकरणाचे कामकाज  पूर्ण केले. त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले निदर्शनास आल्याने श्रीमती आमिशा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरखडे यांचे अभिनंदन केले .

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' विजेत्यांचा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान !

इमेज
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' विजेत्यांचा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान ! मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' ही स्पर्धा घेण्यात आली होती. यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करून सहभागी मंडळांचे परीक्षण केले गेले. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम आलेल्या मंडळास राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवडले गेले होते. पर्यावरणपूरक मूर्ती,  पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश देणारे, सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन, विकासाभिमुख देखावे, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, रक्तदान शिबीर तसेच वैद्यकीय शिबिर इत्यादींचे आयोजन, महिला ग्रामीण, वंचित घटक, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादींबाबत मंडळाने केलेले कार्य, पारंपरिक/ देशी खेळांचे आयोजन आणि गणेश भक्तांसाठी मंडळाकडून  दिल्या जाणाऱ्या  प्राथमिक सुविधा अशा अनेक निकषाच्या आधारे  ३६ जिल्ह्यांतून अंतिम ३ उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्स

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये शाश्वत विकास आणि समर्थ, सशक्त व लवचिक शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे मुख्य ध्येय आहे - प्रा.दीपक नगरकर

इमेज
कराड : (दि. १५, प्रतिनिधी)::- “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमामध्ये प्रशासकीय व्यवस्थांमध्ये अनेक सुधारणा आणि अमुलाग्र बदल केले आहेत. या धोरणाचे शाश्वत विकास आणि समर्थ, सशक्त व लवचिक शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे मुख्य ध्येय आहे  महाविद्यालयात कला ,  वाणिज्य ,  विज्ञान शाखांचे काटेकोर पालन होणार नाही ,  विद्यार्थी आता पाहिजे ते कोर्स घेऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे प्राथमिकता, प्राध्यापकांसह पालकांनाही जागरूक करण्यावर भर, वैचारिक आकलनावर भर ,  सर्जनशीलता आणि समालोचनात्मक विचारसरणीला, कला आणि विज्ञान यांच्यात वेगळेपणा ,  नीतिमत्ता ,  घटनात्मक मूल्ये अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग अशी नवीन शिक्षण धोरणाचे महत्वाचे घटक आहेत.” असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे प्रा. दीपक नगरकर यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज ,  कराड अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. जी. जाधव हे होते.         प्रा. दिपक नगरकर पुढे म्हणाले कि, “२०३५ पर्यंत सर्व उच्

आजपासून हात धुण्याची सवय लावून घ्या,,,,,,,,,,!!

इमेज
आजपासून हात धुण्याची सवय लावून घ्या,,,,,,,,,,!! जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये आज ‘हात धुवा दिना’ चे आयोजन !!         नाशिक – राज्यात स्वच्छतेविषयी लोकचळवळ निर्माण होण्यासाठी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातही जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार असून जिल्ह्य़ातील सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘हात धुवा दिना’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.        जागतिक हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात त्याचे महत्त्व ठसवावे, या विषयी जनजागरण व्हावे, या उददेशाने १५ ऑक्टोाबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो. नाशिक जिल्हयात यानिमित्ताने शाळा व अंगणवाडी स्तरावर  हात धुण्याविषयी जनजागृती करुन हातधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून हात धुण्याचे महत्व सांगितले जाणार आहे.  कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत  नियमित साबणाने हात धुण्याबाबत  मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण भागात याबाबत जन

एक दिवसीय कार्यशाळेत देण्यात आला सुयोग्य स्तनपान आणि कुपोषित बालकांना सुदृढ करण्याचा कानमंत्र !

इमेज
सुयोग्य स्तनपान आणि कुपोषित बालकांना सुदृढ करण्याचा दिला कानमंत्र ! जिल्हा परिषद नाशिक आणि आयआयटी मुंबई कडून तयार होणार कुपोषण निर्मूलनाचा ऍक्शन प्लॅन !        नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग व आयआयटी मुंबई यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयआयटी मुंबई येथील प्राध्यापिका डॉ. रूपल दलाल, प्राध्यापक डॉ. कानन मुदगल्या, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आयआयटी मुंबई येथील तज्ञ अभ्यासकांच्या मदत घेण्यात येणार असून पुढील काळात आशा सेविकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असून कुपोषण निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. आयआयटी

शोध नावीन्यतेचा उपक्रमाचा शुभारंभ !मांडा ग्रामीण विकासाच्या संकल्पना !!

इमेज
शोध नावीन्यतेचा उपक्रमाचा शुभारंभ ! मांडा ग्रामीण विकासाच्या संकल्पना !!       नाशिक : जिल्हा परिषद नाशिक, उमेद अभियान, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने "शोध नाविन्यतेचा" उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस के माथुर¸ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आला.          जिल्हा परिषद नाशिक, उमेद अभियान, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने "शोध नाविन्यतेचा" उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण पायाभूत कल्पनांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांसह या उपक्रमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. या उपक्रमात सह्भागार्थींमधून प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन पारितोषिके व अनुक्रमे पंधरा, दहा व पाच हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, याचसोबत सन्मानपत्र, नवीन उत्पादन