आजपासून हात धुण्याची सवय लावून घ्या,,,,,,,,,,!!

आजपासून हात धुण्याची सवय लावून घ्या,,,,,,,,,,!!

जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये आज
‘हात धुवा दिना’ चे आयोजन !!

        नाशिक – राज्यात स्वच्छतेविषयी लोकचळवळ निर्माण होण्यासाठी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातही जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार असून जिल्ह्य़ातील सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये ‘हात धुवा दिना’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

       जागतिक हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात त्याचे महत्त्व ठसवावे, या विषयी जनजागरण व्हावे, या उददेशाने १५ ऑक्टोाबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो. नाशिक जिल्हयात यानिमित्ताने शाळा व अंगणवाडी स्तरावर  हात धुण्याविषयी जनजागृती करुन हातधुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून हात धुण्याचे महत्व सांगितले जाणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत  नियमित साबणाने हात धुण्याबाबत  मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण भागात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्वांनी सभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

दरम्यान, हात धुवा दिनाबाबत सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी व बालविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या  उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।