शोध नावीन्यतेचा उपक्रमाचा शुभारंभ !मांडा ग्रामीण विकासाच्या संकल्पना !!

शोध नावीन्यतेचा उपक्रमाचा शुभारंभ !
मांडा ग्रामीण विकासाच्या संकल्पना !!

      नाशिक : जिल्हा परिषद नाशिक, उमेद अभियान, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने "शोध नाविन्यतेचा" उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस के माथुर¸ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आला.

         जिल्हा परिषद नाशिक, उमेद अभियान, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने "शोध नाविन्यतेचा" उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण पायाभूत कल्पनांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांसह या उपक्रमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

या उपक्रमात सह्भागार्थींमधून प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन पारितोषिके व अनुक्रमे पंधरा, दहा व पाच हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, याचसोबत सन्मानपत्र, नवीन उत्पादन निर्मितीसाठी मार्गदर्शन प्रचार आणि प्रसार, बीज भांडवल, सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी क्यू आर कोडची निर्मिती करण्यात आली आहे.

त्याचसोबत लिंक देखील देण्यात आली आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून याबाबत नोंदणीसाठी अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२२ असल्याची माहिती नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन विक्रम सारडा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस के माथुर यांनी दिली. सूत्रसंचालन आनंदराव पिंगळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"राडा" इव्हेंट, खेळ आणि प्रतिभेचा जबरदस्त संगम ! युवांमध्ये उतुंग उत्साह!

नासिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन ! नवीन इमारत कशी असेल याची चित्रफीत !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।