नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणान्वये शाश्वत विकास आणि समर्थ, सशक्त व लवचिक शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे मुख्य ध्येय आहे - प्रा.दीपक नगरकर


कराड : (दि. १५, प्रतिनिधी)::- “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमामध्ये प्रशासकीय व्यवस्थांमध्ये अनेक सुधारणा आणि अमुलाग्र बदल केले आहेत. या धोरणाचे शाश्वत विकास आणि समर्थ, सशक्त व लवचिक शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे मुख्य ध्येय आहे  महाविद्यालयात कलावाणिज्यविज्ञान शाखांचे काटेकोर पालन होणार नाहीविद्यार्थी आता पाहिजे ते कोर्स घेऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे प्राथमिकता, प्राध्यापकांसह पालकांनाही जागरूक करण्यावर भर, वैचारिक आकलनावर भरसर्जनशीलता आणि समालोचनात्मक विचारसरणीला, कला आणि विज्ञान यांच्यात वेगळेपणानीतिमत्ताघटनात्मक मूल्ये अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग अशी नवीन शिक्षण धोरणाचे महत्वाचे घटक आहेत.” असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे प्रा. दीपक नगरकर यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेजकराड अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. जी. जाधव हे होते.



        प्रा. दिपक नगरकर पुढे म्हणाले कि, “२०३५ पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्थांना ३०००  हून अधिक विद्यार्थी असलेली बहु-विषय संस्था तयार करावी लागेल.  प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख बहु-विषय उच्च संस्था असेल. ओपन डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन प्रोग्राम्स चालवण्याचा पर्याय संस्थांना असेल. उच्च शिक्षणासाठी तयार केलेली सर्व प्रकारच्या डीम्ड आणि संबंधित विद्यापीठे केवळ विद्यापीठे म्हणून ओळखली जातील. एकात्मिक पद्धतीने मानवीबौद्धिकसामाजिकशारीरिकभावनिक आणि नैतिक क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य आहे. नवीन शिक्षण धोरणात संगीततत्त्वज्ञानकलानृत्यनाट्यगृहउच्च संस्थांचे शिक्षण अभ्यासक्रम यांचा समावेश असेल. बॅचलर पदवी ३ किंवा ४ वर्षांच्या कालावधीची असेल. अकादमी बँक ऑफ क्रेडिट बनेलविद्यार्थ्यांच्या कामगिरीचे डिजिटल रेकॉर्ड जमा केले जातील. दर्जेदार पात्रता संशोधनासाठी नवीन राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन केली जाईलती देशातील सर्व विद्यापीठांशी संबंधित असेल.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले कि,  “नवीन शैक्षणिक धोरणात व्यापक आधारभूतबहु-शाखीयलवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण अभ्यासक्रमविषयांचे सर्जनशील संयोजनव्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण आणि योग्य प्रमाणीकरणासह बहू प्रवेश आणि निर्गम असे टप्पे केले आहेत. आपण सर्वांनी या धोरणाची काटेकोरपणे अमलबजावणी करावयाची आहे.

         ”या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. आर. पी. पवार यांनी केले. तर डॉ. ए.बी. मुळीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रा. संतोष बोंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल, मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड !

तालुका कृषी अधिकारी व कंत्राटी डाटा ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

डॉ. कैलास हरिभाऊ कापडणीस (सर) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने.... (प्रा. रोहित निकम यांनी व्यक्त केले मनोगत)