एक दिवसीय कार्यशाळेत देण्यात आला सुयोग्य स्तनपान आणि कुपोषित बालकांना सुदृढ करण्याचा कानमंत्र !

सुयोग्य स्तनपान आणि कुपोषित बालकांना सुदृढ करण्याचा दिला कानमंत्र !

जिल्हा परिषद नाशिक आणि आयआयटी मुंबई कडून तयार होणार कुपोषण निर्मूलनाचा ऍक्शन प्लॅन !
       नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग व आयआयटी मुंबई यांच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली .


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आयआयटी मुंबई येथील प्राध्यापिका डॉ. रूपल दलाल, प्राध्यापक डॉ. कानन मुदगल्या, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आयआयटी मुंबई येथील तज्ञ अभ्यासकांच्या मदत घेण्यात येणार असून पुढील काळात आशा सेविकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार असून कुपोषण निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. आयआयटी मुंबई येथील प्राध्यापिका डॉ. रूपल दलाल यांनी सुयोग्य स्तनपानाबद्दल मार्गदर्शन केले बाळाची आई गरोदर असल्यापासून पुढील एक हजार दिवस महत्वाचे असतात, गरोदर मातांना या काळात स्वतःच्या व बाळाच्या आहाराचे योग्य मार्गदर्शन केल्यास कुपोषणाच्या समस्येवरती आपण निश्चित मात करू शकतो, यासंदर्भात आयआयटी मुंबईच्या वतीने गुजरात येथील आदिवासी भाग, मेळघाट येथील बालकांच्या कुपोषण निर्मूलनाच्या यशस्वी प्रयोगांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी महिला व बालकल्याण विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी संजय सोनवणे, रवींद्र देसाई, विस्तार अधिकारी सांख्यिकी योगेश भोये, संजय मोरे, परिचर विश्वजित खैरे, सारिका गायकवाड आदींनी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।