महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' विजेत्यांचा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान !

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' विजेत्यांचा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२२' ही स्पर्धा घेण्यात आली होती. यासाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करून सहभागी मंडळांचे परीक्षण केले गेले. प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम आलेल्या मंडळास राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवडले गेले होते. पर्यावरणपूरक मूर्ती,  पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश देणारे, सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन, विकासाभिमुख देखावे, ध्वनी प्रदूषण रहित वातावरण, रक्तदान शिबीर तसेच वैद्यकीय शिबिर इत्यादींचे आयोजन, महिला ग्रामीण, वंचित घटक, शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादींबाबत मंडळाने केलेले कार्य, पारंपरिक/ देशी खेळांचे आयोजन आणि गणेश भक्तांसाठी मंडळाकडून  दिल्या जाणाऱ्या  प्राथमिक सुविधा अशा अनेक निकषाच्या आधारे  ३६ जिल्ह्यांतून अंतिम ३ उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड केली गेली. 

या राज्यस्तरीय स्पर्धेत 'श्री खंडकेश्वर म. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, अकोला' यांनी प्रथम पारितोषिक (रोख रुपये ५,००,०००/-  व प्रमाणपत्र), 'सुवर्णयुग तरूण मंडळ, पाथर्डी, अहमनगर' यांनी द्वितीय पारितोषिक (रोख रुपये २,५०,०००/- व प्रमाणपत्र), आणि 'स्वप्नाक्षय मित्र मंडळ, अंधेरी, मुंबई उपनगर' यांनी तृतीय पारितोषिक (रोख रुपये १,००,०००/- व प्रमाणपत्र) पटकावले.  तर एकविरा गणेशोत्सव मंडळ, अमरावती, कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ, औरंगाबाद, जय किसान गणेश मंडळ, बीड, आदर्श गणेश मंडळ, भंडारा, सहकार्य गणेश मंडळ, चिखली, बुलढाणा, न्यू इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वॉर्ड, चंद्रपूर, श्री संत सावता गणेश मंडळ, सोनगीर, धुळे, लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी, गडचिरोली, नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी, गोंदिया, श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी, हिंगोली, जागृती मित्र मंडळ, भडगाव, जळगाव, संत सावता गणेश मंडळ, परतुर, जालना, श्री गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी, कोल्हापूर, बाप्पा गणेश मंडळ, लातूर, पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म. जोशी मार्ग, मुंबई शहर, विजय बाल गणेश उत्सव मंडळ, किराडपुरा, नागपूर, अपरंपार गणेश मंडळ, नांदेड, क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ, नंदुरबार, अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर, नाशिक, बाल हनुमान गणेश मंडळ, उस्मानाबाद, साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा, पालघर, स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा, परभणी, जय जवान मित्र मंडळ, नानापेठ, पुणे, संत रोहिदास तरुण विकास मंडळ, महाड, रायगड, पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड, रत्नागिरी, तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा, सांगली, सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, सातारा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवडा, सिंधुदुर्ग, श्रीमंत मानाचा कसबा गणपती, सोलापूर, धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी, ठाणे, मंत्रीपार्क गणेशोत्सव मंडळ, वाशिम, नवयुग गणेश मंडळ, यवतमाळ ही गणेश मंडळे जिल्हास्तरीय (रोख रक्कम रुपये २५,०००/- व प्रमाणपत्र) पारितोषिकासाठी विजेती ठरली. 
सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी ५:०० वा. संपन्न होत असून त्या दिवशी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे. 
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री  सुधीर मुनगंटीवार , मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार  राहुल शेवाळे, स्थानिक आमदार सदा सरवणकर उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते विजेत्या मंडळांचा सन्मान केला जाणार आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे खास आयोजन रवींद्र नाट्यमंदिर मध्ये करण्यात येत आहे.  या कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून विजेत्या मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक