पोस्ट्स

शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !

इमेज
शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !         नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (१४ रोजी ) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समिती सुरगाणा येथे आढावा बैठक घेतली. पंचायत समिती सुरगाणाच्या वतीने यावेळी सरपंच संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी देखील पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय यंत्रणा सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले.       उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सरपंच संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे कामकाज, योजना, ग्रामपंचायतींना मिळणारा ५% बंधित आबंधित नि

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान; सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ

इमेज
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान;  सामूहिक व वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत- मोहन वाघ                                      नाशिक १४,(जिमाका वृत्तसेवा)::- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.         या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२२-२३ अंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जावू नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाची योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी स्वखर्चाने किंवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केल्या

आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

इमेज
आरोग्य विभागाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !        नाशिक: (दि. 12) - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र - २०२२ अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. १३ डिसेंबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे.          विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, हिवाळी सत्र - २०२२ मधील परीक्षा राज्यातील एकूण १७१ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी सुमारे ४६००० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. यानुसार सदर परीक्षा ३० डिसेंबर २०२२ पर्यंत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.          हिवाळी सत्र - २०२२ परीक्षेत पदवी अभ्यासक्रमाचे  First Year MBBS (Old) Supplementary, BDS, BAMS, BUMS, BHMS, BPTh, BOTh,  P.B.B.Sc ., Basic B.Sc., B.P.O., BASLP, व PG - DM, MCh, M.D.S., Diploma Dentistry, MD/MS Ayurveda & Unani, MD Homoeopathy, Diploma Ayurveda, MOTh, MASLP, M.Sc. (Aud.), M.Sc. (SLP), MPO तसेच University Courses – BPMT, M.Sc. Pharmaceutical, MPH (N), MBA, M.Phil

वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद

इमेज
वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद !        नाशिक ( प्रतिनिधी) "वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही. वेदांचे सामर्थ्य अतर्क्य व मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचे आहे." असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले. ते दत्तजयंती निमित्त शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिन्मय मिशनचे नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पपू मोहन महाराज गाणगापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रभा आठवले यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र सारायण या सात खंडातील ग्रंथाचे गुरूंना अर्पण करण्यात आले.        स्वामीजी पुढे म्हणाले, "वेद म्हणजे ज्ञान भांडार. आपण एखादा विषय शिकतो ते प्रत्येक शास्त्र खूप मोठे. त्या सर्वांचा साठा म्हणजे वेद होय. असा कोणताच विषय नाही जो वेदात नाही. वेद हे श्वासाप्रमाणे भगवानांकडून प्रकट झाले. वेद अभ्यास कठीण असल्याने रामायण, महाभारत निर्माण झाले, गीता निर्माण झाले. गुरुचरित्र वाचा. मनुष्यदेहाचा उपयोग कसा करावा यासाठीचे बुकलेट म्हणजे वेद. ज्या विषयाचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा प्रमाण याद्वारे होऊ शकत

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचाकॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !

इमेज
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा कॅपजेमिनी सॉफ्टवेअरशी करार !      मुंबई (प्रतिनिधी)::- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी कॅपजेमिनी सॉफ्टवेअरने करार केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे.          विद्यार्थ्यांची निवड तसेच त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना कॅपजेमिनीच्या तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकी कार्यबलाचा भाग बनण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना उद्योगासाठी तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे जी काळाची गरज आहे, असे विचार प्रतिष्ठानचे सरचिटणीस आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !

इमेज
अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !           मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर -मुंबई या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.      शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला.कीर्तनसंस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्व , शिस्तप्रिय आणि  मोत्यासारखे सुंदर अक्षर , सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत , एका ओळीत सुबक पणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणात सुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता. संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थाच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात द ल वैद्य मार्ग दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले

स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !

इमेज
स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !          नाशिक (प्रतिनिधी) देशात आणि जगभरात कार्यरत असलेल्या चिन्मय मिशनचे परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संग कार्यक्रम शनिवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंचवटी चिंचबन येथील आश्रमात करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून त्यांच्या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्रामातर्फे करण्यात आले आहे. स्वामी तेजोमयानंद हे १९९४ ते २०१४ दरम्यान चिन्मय मिशनचे प्रमुख होते. नंतर २०१७ पासून स्वामी स्वरूपानंद हे चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत. त्यांना २०१६ मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देवून भारत सरकारने गौरविले आहे. ते कोईमतूर येथील चिन्मय सेंटर ऑफ वर्ल्ड अंडरस्टान्डींग, दिल्ली, चिन्मय इंटरनशनल स्कूलचे देखील प्रमुख आहेत. याबरोबरच त्यांनी वेदांत तत्वज्ञानावर शंभरावर पुस्तके लिहिली आहेत. बऱ्याच काळानंतर तेजोमयानंद यांचे नाशिकमध्ये आगमन होत असून या सत्संगास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.