वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद


वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही : तेजोमयानंद !
       नाशिक ( प्रतिनिधी) "वेदात नाही असा कोणताही विषय जगात नाही. वेदांचे सामर्थ्य अतर्क्य व मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडचे आहे." असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले.

ते दत्तजयंती निमित्त शंकराचार्य सभागृहात आयोजित प्रवचनप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चिन्मय मिशनचे नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पपू मोहन महाराज गाणगापूरकर उपस्थित होते. यावेळी प्रभा आठवले यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र सारायण या सात खंडातील ग्रंथाचे गुरूंना अर्पण करण्यात आले.
       स्वामीजी पुढे म्हणाले, "वेद म्हणजे ज्ञान भांडार. आपण एखादा विषय शिकतो ते प्रत्येक शास्त्र खूप मोठे. त्या सर्वांचा साठा म्हणजे वेद होय. असा कोणताच विषय नाही जो वेदात नाही. वेद हे श्वासाप्रमाणे भगवानांकडून प्रकट झाले. वेद अभ्यास कठीण असल्याने रामायण, महाभारत निर्माण झाले, गीता निर्माण झाले. गुरुचरित्र वाचा.
मनुष्यदेहाचा उपयोग कसा करावा यासाठीचे बुकलेट म्हणजे वेद. ज्या विषयाचे ज्ञान प्रत्यक्ष किंवा प्रमाण याद्वारे होऊ शकत नाही त्याचे ज्ञान वेद देतात. वेदांचा मुख्य विषय ब्रह्मविद्या, त्याच्या प्राप्तीसाठी सर्व विषय आहेत. विठ्ठलास शरण जावे म्हणजे स्वतः ची इच्छा ठेऊ नये म्हणजे शरण ! निष्ठापूर्वक नाम घ्यावे, असे संत तुकाराम म्हणतात."
        लेखिका प्रभा आठवले यांनी व्हिडीओवर मनोगत व्यक्त केले. श्री गुरुचरित्रात कुठेही महिलांचा अपमान केलेला नाही. योग्य आचरण ज्याने त्याने ठरवावे. स्त्रियांना गुरुचरित्र पारायण करण्यास हरकत नाही. ओव्यांचा अनुवाद करण्यास अडीच वर्षे लागली. हे काम करण्यासाठी कॉम्पुटर शिकले. वेबसाईट सुरू केली. ग्रंथाची मागणी वाढली. गेली १० वर्ष हे काम करीत ७ पुस्तकं गुरुकृपेने लिहिली. असे त्या म्हणाल्या.
         गुरुचरित्राचे इंग्रजी भाषांतर करणारे कॅनडा येथील श्याम तंजावरकर यांचेही मनोगत व्हिडीओद्वारे ऐकविण्यात आले. इंदोरचे श्रीकांत जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत करून ग्रंथ अर्पण केला. प्रभा आठवले यांच्या कन्या  अनुराधाताई घाणेकर यांनी प्रकाशक नात्याने मनोगत व्यक्त केले. एड. नागनाथ गोरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!