अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !

अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उपाध्ये काळाच्या पडद्याआड !

          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ८२ वर्षीय जुनी सुप्रसिद्ध अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर -मुंबई या नामांकीत संस्थेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे समर्थपणे सांभाळणारे सुरेश उपाध्ये यांचे शुश्रुषा रुग्णालयात गुरुवारी सकाळी निधन झालं.

     शिक्षकी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या जीवनाचा उर्वरीत काळ त्यांनी कीर्तन संस्थेला दिला.कीर्तनसंस्थेचा आर्थिक तसेच सर्व प्रकारचा कारभार त्यांनी निस्पृहपणे चोखपणे सांभाळला. उत्तम वक्तृत्व , शिस्तप्रिय आणि  मोत्यासारखे सुंदर अक्षर , सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत , एका ओळीत सुबक पणे सर लिहीत. आजपर्यंत अनेक कीर्तनकार घडवण्यात तसेच कीर्तन संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम त्यांनी राबवले. आजारपणात सुद्धा कीर्तन संस्थेचाच विचार त्यांच्या मनात होता.
संस्थेच्या आणि त्यांच्याशी निगडित संस्थाच्या वतीने २० डिसेंबर रोजी संस्थेच्या सभागृहात द ल वैद्य मार्ग दादर येथे शोकसभेचे आयोजन केले असल्याचं प्रमुख विश्वस्त रवींद्र आवटी यांनी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।