शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश ! मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !

शासकीय यंत्रणेतर्फे नागरिकांना सुविधा पुरवण्याचे निर्देश !
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यात भेट !

        नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी (१४ रोजी ) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समिती सुरगाणा येथे आढावा बैठक घेतली. पंचायत समिती सुरगाणाच्या वतीने यावेळी सरपंच संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गट विकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

         सुरगाणा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयांनी नागरिकांना सर्व सुविधा पुरवाव्यात, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणेसह नागरिकांनी देखील पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासकीय यंत्रणा सुरगाणा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले.
      उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या सरपंच संवाद कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे कामकाज, योजना, ग्रामपंचायतींना मिळणारा ५% बंधित आबंधित निधी, मनरेगा योजना याबद्दल मार्गदर्शन केले.
           आयुषमान भारत गोल्ड कार्ड, नरेगा जॉब कार्ड, बेबी किटचे प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
       सरपंच संवाद कार्यक्रमात नामदेव भोये सरपंच, ग्रामपंचायत सराड, संजाबाई खंबाईत, सरपंच ग्रामपंचायत गोंदूणे, श्रीमती रंजना चौधरी सरपंच ग्रामपंचायत पळसन यांनी आपले मनोगत व्यक्त करत ग्रामपंचायतींचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास हा लोकसहभागातून करण्यात येईल असे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाची सांगता ही बालविवाह प्रतिबंधक शपथ घेवून करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी तालुका स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करत अधिकाधिक लोकाभिमुख काम करावे असे सांगितले.
   मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांना भेट-


मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कोठुळा येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली त्याचबरोबर योजनेत काम करणाऱ्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला.
        उंबरठाण आरोग्य उपकेंद्रास भेट -


सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण आरोग्य उपकेंद्र येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देत आरोग्य यंत्रणेद्वारे दिला जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत चौकशी केली यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत चौकशी केली.


     जि. प. शाळा उंबरठाण येथे भेट -


जिल्हा परिषद शाळा उंबरठाण येथे भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना गणितं देखील सोडवायला दिली, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेतील उपक्रम याबद्दल त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।