स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !


स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संगाचे शनिवारी आयोजन !

         नाशिक (प्रतिनिधी) देशात आणि जगभरात कार्यरत असलेल्या चिन्मय मिशनचे परमपूज्य स्वामी तेजोमयानंद यांचे दर्शन आणि सत्संग कार्यक्रम शनिवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता पंचवटी चिंचबन येथील आश्रमात करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहून त्यांच्या सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन अश्रामातर्फे करण्यात आले आहे.


स्वामी तेजोमयानंद हे १९९४ ते २०१४ दरम्यान चिन्मय मिशनचे प्रमुख होते. नंतर २०१७ पासून स्वामी स्वरूपानंद हे चिन्मय मिशनचे प्रमुख आहेत. त्यांना २०१६ मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देवून भारत सरकारने गौरविले आहे. ते कोईमतूर येथील चिन्मय सेंटर ऑफ वर्ल्ड अंडरस्टान्डींग, दिल्ली, चिन्मय इंटरनशनल स्कूलचे देखील प्रमुख आहेत. याबरोबरच त्यांनी वेदांत तत्वज्ञानावर शंभरावर पुस्तके लिहिली आहेत. बऱ्याच काळानंतर तेजोमयानंद यांचे नाशिकमध्ये आगमन होत असून या सत्संगास उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन चिन्मय मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।