पोस्ट्स

गटविकास अधिकाऱ्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
    गटविकास अधिकाऱ्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !       अहमदनगर::- ओंकार ईश्वर आवटे,  वय २५, ग्रामसेवक, वर्ग ३, चांदे खुर्द, ता- कर्जत याने तक्रारदाराकडे ७०००/-₹ लाचेची मागणी केली होती व प्रकरणमंजूरी पूर्व ५०००/- रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.      तक्रारदार हे शेतकरी असुन, त्यांनी शासनाच्या गाय गोठा योजने अंतर्गत अनुदानासाठी पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते, ते प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवक चांदे खु. यांनी तक्रारदार यांचेकडे ७०००/-₹ लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कडे प्राप्त झाली होती, त्यानुसार आज रोजी चांदे खुर्द गावी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान यातील आलोसे यांनी गट विकास अधिकारी कर्जत अमोल जाधव यांचे कडून सदर प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार यांचेकडे  अमोल जाधव यांचे करिता ७०००/-₹ लाचेची मागणी करून प्रथम ५०००/-₹ व काम झाल्यानंतर २०००/-₹ स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार आज रोजी चांदे खुर्द येथे लाचेचा सापळा आयोजित केला असता आलोसे य

षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम !

इमेज
    षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801             नुकतेच लोकप्रिय माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांचे निधन झाले. साठच्या दशकातील ते डॅशिंग अष्टपैलू खेळाडू होते. १९६० साली इंग्लंडला आणि १९७१ मध्ये वेस्ट इंडिजला कसोटी सामन्यात पराभूत करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तेव्हा मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळले जात नव्हते. तथापि, सलीम दुर्रानी कसोटीतही धुवांधार फलंदाजी करून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करायचे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारण्यात ते माहीर होते. त्यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. त्यांच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा ...                                                         षटकारांचा बादशहा : प्रिन्स सलीम !                      दिलदार स्वभाव आणि क्रिकेटमधील कौशल्यामुळे ‘प्रिन्स सलीम’ या नावाने क्रिकेट वर्तुळात ओळखले  जाणारे  सलीम दुर्रानी यांचा जन्म अफगाणिस्तानमधील काबूल येथे ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला होता. दुर्रानी यांनी १९६० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटीत पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९६० ते १९७३ या काळात भ

फडतूस-काडतूस IS MIND CHANGING CONCEPT ठरतेय ! चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए !

इमेज
फडतूस-काडतूस IS MIND CHANGING CONCEPT ठरतेय ! चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए ! NEWS MASALA, NASHIK           चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए ! अशा आशयाच्या मजकुरांवर जनसामान्यांच्या भावना खूपच रंजक असतात, सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा असेच काहीसे झाले आहे असे दिसते. हे सर्वसामान्यांच्या विचार शक्तीला (mind changing concept) एकप्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र विरोधीपक्ष हे लक्षात घेत नाही, की समजूनही वेगळे काही हाती लागते काय यासाठी, मुद्दामहून दुर्लक्ष करीत असेल तर हा धोक्याचा इशारा ठरेल. "फडतूस - काडतूस" उच्चारणाऱ्यांची तत्कालीन मानसिकता व शब्दफेक बघीतली की तत्काळ लक्षात आल्याशिवाय राहत नाही.  ------------------------------------------------------ FOLLOW www.newsmasala.in  NEWS MASALA, NASHIK ------------------------------------------------------- नेहमीच्या सवयीप्रमाणे "फडतूस" शब्दाचा वापर ठाकरी भाषेत बोलल्यासारखे ऊद्धवजींना वाटत असेलही पण जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब

नाशिक बिझिनेस असोसिएशन पदग्रहण सोहोळा उत्साहात संपन्न !

इमेज
नाशिक बिझिनेस असोसिएशन पदग्रहण सोहोळा उत्साहात संपन्न ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801         नाशिक - रेफरन्स मार्केटिंगमध्ये आपण एकमेकांना व्यवसाय देतो, परंतु आता असे अनेक शासकीय पोर्टल आहेत त्याद्वारे सुद्धा आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो, आपण आपला बिझिनेस ग्रुप म्हणून न रहता एक एनबीए कुटुंब झाले असून यामध्ये व्यवसायाशिवाय अनेक उपक्रम सदस्यांसाठी तसेच समाजासाठी आपण राबवतो हि उल्लेखनीय बाब असल्याचे प्रतिपादन मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी केले      नाशिक बिझिनेस असोसिएशनच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी मनपा उपायुक्त घोडे पाटील बोलत होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून धनंजय बेळे, संतोष मंडलेचा, आशिष कटारिया, विजय सानप, निखिल पांचाळ, धनंजय धुमाळ, आर्की.चारुदत्त नेरकर, सुनील चोपडा, मिलिंद शेटे, विक्रांत आव्हाड, सुनील भोर, गोविंद नायर, संतोष लोढा, विजय बाविस्कर, संदीप काकड, केशव डिंगोरे, राजू व्यास, प्रवीण चांडक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एनबीएच्या नूतन अध्यक्षपदी विक्रम खैरनार, उपाध्यक्ष बाळासाहेब आमरे, सेक्रेटरी वैशाखी सोनार, सहसेक्रेटरी नितीन राका, खजिनदार दिलीप रं

खासदारकी, आमदारकी साठी प्रशासकीय राजवटीत माजी सदस्यांच्या शासकीय कार्यालयात चकरा ! विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या उपक्रमाची आठवण !!

इमेज
खासदारकी, आमदारकी साठी प्रशासकीय राजवटीत माजी सदस्यांच्या शासकीय कार्यालयात चकरा ! विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या उपक्रमाची आठवण !! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801     नासिक::- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत, कधी निवडणूका लागतील हे सांगता येत नाही, अशातच २०२४ च्या लोकसभा व कदाचित त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. आज नासिक जिल्हा परिषद व नासिक महानगरपालिका या संस्थांचा कारभार प्रशासकीय राजवटीच्या अंमलाखाली असला तरीही अनेक माजी सदस्यांच्या अशा शासकीय कार्यालयात तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमधील चकरा हा चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार, आमदार व्हायचे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच जी तयारी सुरू झाली आहे त्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या, जनसंपर्काची ठिकाणे म्हणजे जिल्हा परिषद व महानगरपालिका परिसर.              जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची छोट्या-छोट्या निमित्ताने वर्दळ वाढली आहे. निमित्त एक आणि राजकीय चाचपणी जास्त अशी परिस्थिती आहे. नेता येणार म्हटल्यावर जाहिरातबाजी बरोबरच नेत्यांच्

४००० रूपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! आर्थिक नववर्षातील नासिक विभागातील पहीली कारवाई !

इमेज
४००० रूपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! आर्थिक नववर्षातील नासिक विभागातील पहील्या कारवाईने सुरूवात !               नासिक::- आलोसे प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष, तलाठी, आलोसे शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष, कोतवाल, खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव यांनी तक्रारदाराकडे ४०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.         यातील तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे न्हायदे व कोळी यांनी ४,०००/रु.लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम उपस्थित  पंचासमक्ष स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा येथे स्वीकारली. म्हणून दोन्ही आरोपीतांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.        सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.व

ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपल्या गावाचा सर्वांगिण विकास करावा. - आशिमा मित्तल नरेगा अंतर्गत नाशिक जिल्ह्याने गाठला १०० कोटीचा पल्ला !

इमेज
ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपल्या गावाचा सर्वांगिण विकास करावा. - आशिमा मित्तल  नरेगा अंतर्गत नाशिक जिल्ह्याने गाठला १०० कोटीचा पल्ला ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801       नाशिक(प्रतिनिधी)::- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात २७.२२ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती करून १०१ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला. नाशिक जिल्हयाचा नरेगामध्ये तिसऱ्या टप्प्यात समावेश असून त्याची अंमलबजावणी सन २००८ पासून सुरु आहे. मागील १५ वर्षातील हा सर्वाधिक खर्च यंदाच्या वर्षी झाला आहे. याआधी सर्वाधिक खर्च हा सन २०१८-१९ या वर्षात झालेला असून तो ७५ कोटी इतका होता. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १०१ कोटी खर्च करून आतापर्यंतचा सर्वाधिक खर्चाचा उच्चांक करण्यात आलेला आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४५३७५ कामे हाती घेवून १६२६८ कामे पूर्ण करण्यात आलेली असून उर्वरित २९१०७ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात मालेगाव, नांदगाव, बागलाण, येवला, पेठ व सुरगाणा या तालुक्यात सर्वांधिक कामकाज झालेले आहे.           जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, बंदरे खनिकर्म, महाराष्ट्र राज्

आट्यापाट्या महामंडळ राज्य कार्यकारिणीची घोषणा, सहसचिव पदी नाशिकचे संजय पाटील यांची निवड !

इमेज
आट्यापाट्या महामंडळ राज्य कार्यकारिणीची घोषणा, सहसचिव पदी नाशिकचे संजय पाटील यांची निवड ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801     नासिक(प्रतिनिधी)::- महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ याची सर्वसाधारण सभा दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी तईवाडे कॉलेज नागपूर येथे संपन्न झाली. या सभेत २०२३-२७  कालावधीसाठी राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली. निवड प्रक्रिये करता एडवोकेट सचिन सांबरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होते तसेच सेवानिवृत्त न्यायाधीश करुणाशंकर, अखिल भारतीय आट्यापाट्या संघटनेचे सचिव दीपक कवीश्वर हे निरीक्षक  मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर प्रमुखांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली त्यात खालील कार्यकारणी ची निवड  घोषित करण्यात आली..       अध्यक्षपदी डॉ. बबनराव तायवडे, सचिवपदी अमरराव चकोले, कोषाध्यक्ष सतीश शिखर, उपाध्यक्ष डॉ. उल्हास नांदुरकर, डॉ. श्रीधर झाकूलकर, जयकुमार सोनखास्कर, सहसचिव धर्मेंद्र काळे, शरद गवर, संजय पाटील, अमर खराटे,  सदस्य ज्ञानेश काळे, संजय काळे, अनंत पवार, अनिल माकडे, बळवंत निकुंभ, श्याम देशमुख अशी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन जय क

माय मी येसू वं वणी गड ले ! यांतून अजय कुमावत प्रेक्षकांना दिसले नव्या रूपात !

इमेज
माय मी येसू वं वणी गड ले ! यांतून अजय कुमावत प्रेक्षकांना दिसले नव्या रूपात ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801 जळगाव (प्रतिनिधी)::- खान्देशी कलाकार अजय कुमावत यांचे नवीन गाणं माय मी येसू वं वणी गड ले हे नुकतेच रिलीज झाले आहे व काही तासात या गाण्याला हजारो प्रेक्षकांनी पसंत केले. हे गाणं Pramod Mahajan Jalgaon YouTube channel वर रिलीज झाले आहे. या गाण्याची सर्व तांत्रिक बाजू प्रमोद महाजन यांनी सांभाळत एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर केले. या गाण्याचं चित्रीकरण जळगावातील नशिराबाद येथील निसर्गरम्य वातावरणात झाले आहे. या गाण्यात दोन जोडींचा समावेश आहे. अजय कुमावत यांच्या सोबत प्रार्थना गायकवाड व प्रमोद महाजन सोबत नम्रता बाविस्कर दिसून आले आहेत. त्याचा हा हटके नवीन अंदाज हा बऱ्याच लोकांना आवडत आहे.            नावीन्यपूर्ण गाणं व्हावे हि इच्छा मनात बाळगून गाण्याचं चित्रीकरण आयफोन वर (iPhone) करण्यात आले आहे. गाणं भैय्यासाहेब मोरे व मेघा मुसळे यांनी गायले आहे. गाण्याला संगीताची साथ प्रमोद महाजन यांनी दिली आहे व दिग्दर्शन प्रदीप भोई यांनी केले आहे. उत्कृष्टपणे एडिटिंग योगेश ठाकूर यांनी

राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती रसिकांनी बघाव्या -डॉ. शेफाली भुजबळ

इमेज
राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती रसिकांनी बघाव्या -डॉ. शेफाली भुजबळ  नाशिकरोडच्या पीएनजी कलादालनात चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801     नाशिक ( प्रतिनिधी ) - भारतीय कलांचा  समृद्ध ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे संचालक अजित गाडगीळ यांनी कलेचे धन कलादालनाच्या माध्यमातून नाशिककरांपर्यंत आणले आहे. राजा रविवर्मा यांच्या चित्रकृती रसिकांनी, कलाविद्यार्थ्यांनी आवर्जून बघाव्या व आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन एमइटीच्या संचालिका शेफाली भुजबळ यांनी केले.     नाशिकरोडच्या पु.ना.गाडगीळ अँड  सन्सच्या वातानुकूलित कलादालनात श्रेष्ठ  भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांचा लिथो  ओलिओग्राफचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. काल त्याचे उदघाट्न डॉ. शेफाली भुजबळ आणि कलासमीक्षक संजय देवधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार रमेश जाधव, सुभाष वाघ, अतुल भालेराव आणि  पीएनजीचे अधिकारी राहुल शेवकरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यवस्थापिका प्रविणा दुसाने यांन