४००० रूपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ! आर्थिक नववर्षातील नासिक विभागातील पहीली कारवाई !

४००० रूपयांची लाच स्वीकारताना दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

आर्थिक नववर्षातील नासिक विभागातील पहील्या कारवाईने सुरूवात !
       
      नासिक::- आलोसे प्रमोद प्रल्हाद न्हायदे , वय-४५ वर्ष, तलाठी, आलोसे शांताराम यादव कोळी , वय-५२ वर्ष, कोतवाल, खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव यांनी तक्रारदाराकडे ४०००/- रू. लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

        यातील तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष आलोसे न्हायदे व कोळी यांनी ४,०००/रु.लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम उपस्थित  पंचासमक्ष स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा येथे स्वीकारली. म्हणून दोन्ही आरोपीतांविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
       सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव., सापळा व तपास अधिकारी एस.के.बच्छाव, पोलिस निरीक्षक, यांच्या पथकातील पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने , कारवाई मदत पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,  नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!