आट्यापाट्या महामंडळ राज्य कार्यकारिणीची घोषणा, सहसचिव पदी नाशिकचे संजय पाटील यांची निवड !

आट्यापाट्या महामंडळ राज्य कार्यकारिणीची घोषणा, सहसचिव पदी नाशिकचे संजय पाटील यांची निवड !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

    नासिक(प्रतिनिधी)::- महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळ याची सर्वसाधारण सभा दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी तईवाडे कॉलेज नागपूर येथे संपन्न झाली. या सभेत २०२३-२७  कालावधीसाठी राज्य कार्यकारिणी घोषित करण्यात आली. निवड प्रक्रिये करता एडवोकेट सचिन सांबरे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होते तसेच सेवानिवृत्त न्यायाधीश करुणाशंकर, अखिल भारतीय आट्यापाट्या संघटनेचे सचिव दीपक कवीश्वर हे निरीक्षक  मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर प्रमुखांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली त्यात खालील कार्यकारणी ची निवड  घोषित करण्यात आली..

      अध्यक्षपदी डॉ. बबनराव तायवडे, सचिवपदी अमरराव चकोले, कोषाध्यक्ष सतीश शिखर, उपाध्यक्ष डॉ. उल्हास नांदुरकर,

डॉ. श्रीधर झाकूलकर, जयकुमार सोनखास्कर, सहसचिव धर्मेंद्र काळे, शरद गवर, संजय पाटील, अमर खराटे,  सदस्य ज्ञानेश काळे, संजय काळे, अनंत पवार, अनिल माकडे, बळवंत निकुंभ, श्याम देशमुख अशी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन जय कवीश्वर यांनी केले सभेला डॉ. अशोक पाटील, डॉ. शाम चरडे, डॉ. संजय चौधरी तसेच विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।