खासदारकी, आमदारकी साठी प्रशासकीय राजवटीत माजी सदस्यांच्या शासकीय कार्यालयात चकरा ! विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या उपक्रमाची आठवण !!

खासदारकी, आमदारकी साठी प्रशासकीय राजवटीत माजी सदस्यांच्या शासकीय कार्यालयात चकरा !
विद्यमान खासदार हेमंत गोडसेंच्या उपक्रमाची आठवण !!

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

    नासिक::- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत, कधी निवडणूका लागतील हे सांगता येत नाही, अशातच २०२४ च्या लोकसभा व कदाचित त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. आज नासिक जिल्हा परिषद व नासिक महानगरपालिका या संस्थांचा कारभार प्रशासकीय राजवटीच्या अंमलाखाली असला तरीही अनेक माजी सदस्यांच्या अशा शासकीय कार्यालयात तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमधील चकरा हा चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार, आमदार व्हायचे स्वप्न साकार करण्यासाठी आतापासूनच जी तयारी सुरू झाली आहे त्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या, जनसंपर्काची ठिकाणे म्हणजे जिल्हा परिषद व महानगरपालिका परिसर.  

           जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची छोट्या-छोट्या निमित्ताने वर्दळ वाढली आहे. निमित्त एक आणि राजकीय चाचपणी जास्त अशी परिस्थिती आहे. नेता येणार म्हटल्यावर जाहिरातबाजी बरोबरच नेत्यांच्या पुढे-मागे फिरणे हे नित्यनेमाने होणारच. जेथे जशी संधी मिळेल तेथे मनाजोगती वाक्ये नेत्यांकडून वदवून घ्यायची जी भविष्यात पूर्णपणे सत्यात उतरतीलच याची सुतराम शक्यता नसते. 
          आपली ताकद किती मोठी आहे, खर्च करायला मागेपुढे पाहणार नाही याची तोंडदेखली खरी-खोटी जशी असेल तशी हमी द्यायची व खासदारकी किंवा आमदारकीचे तिकीट आपणालाच यासाठी नेत्यांचा हात पाठीवर ठेवून एक छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारीत करायचे, थोड्याफार व्हिव्हज् व कमेंट आल्या की दोन चार दिवसांनंतर सरळ कार्यालयांचे उंबरठे झिजवायला सुरुवात करायची, तेथील परिसरात दोन-पाच लोकांशी गप्पांचा "वांझोटा" (तूर्तास)  फड रंगवायचा हे चाणाक्ष उमेदवाराचं हक्काचं हत्यार मानायला हरकत नाही. 

             नासिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी २००९ ला  मनसेकडून उमेदवारी केली तेव्हा पराभवाला सामोरे जावे लागले होते मात्र २०१४ च्या निवडणूक पूर्व तयारीत सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी हा फंडा राबविला होता आणि यशस्वीही झाला होता. कार्यालयांच्या आवारात कुठलेही महत्वाचे काम नसताना जनसामान्यांच्या दृष्टीस न पडणारा राजकीय हेतू साध्य करण्याचा मनसुबा जाहीर वाच्यता न करता ख्यालीखुशाली वर तासनतास ताव मारत परागंदा व्हायचे. शेवटी याचा परिणाम थोड्याच दिवसांत मतपेटीतील भरघोस मतांमध्ये परावर्तित झालेला बघायला मिळाला. तो ही नासिक च्या खासदारकी चा इतिहास बदलत दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवला आणि तशाच पठडीत शिरण्याचा व भविष्यात खासदारकी, आमदारकी साठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी सदस्य यांच्या  चकरा जिल्हा परिषद, महानगरपालिका परिसरात वाढल्यास वावगे ठरू नये. अशा भावी खासदार आमदार यांना भरभरून शुभेच्छा ! त्यांनी यश संपादन करावे पण जुळलेल्या मातीशी इमान राखत मार्गक्रमण करण्याची आलेली संधी दवडू नये इतकंच,,,,,,,,,,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!