फडतूस-काडतूस IS MIND CHANGING CONCEPT ठरतेय ! चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए !

फडतूस-काडतूस IS MIND CHANGING CONCEPT ठरतेय !
चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए !

NEWS MASALA, NASHIK

          चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए ! अशा आशयाच्या मजकुरांवर जनसामान्यांच्या भावना खूपच रंजक असतात, सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण सुद्धा असेच काहीसे झाले आहे असे दिसते. हे सर्वसामान्यांच्या विचार शक्तीला (mind changing concept) एकप्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र विरोधीपक्ष हे लक्षात घेत नाही, की समजूनही वेगळे काही हाती लागते काय यासाठी, मुद्दामहून दुर्लक्ष करीत असेल तर हा धोक्याचा इशारा ठरेल. "फडतूस - काडतूस" उच्चारणाऱ्यांची तत्कालीन मानसिकता व शब्दफेक बघीतली की तत्काळ लक्षात आल्याशिवाय राहत नाही. 
------------------------------------------------------
FOLLOW www.newsmasala.in  NEWS MASALA, NASHIK
-------------------------------------------------------
नेहमीच्या सवयीप्रमाणे "फडतूस" शब्दाचा वापर ठाकरी भाषेत बोलल्यासारखे ऊद्धवजींना वाटत असेलही पण जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा राज ठाकरेंची भाषाशैली ला साजेसे नक्कीच नसते,

अशी भावना महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनतेला वाटते,  तरीही अट्टाहासाने बोलून तात्पुरती सहानुभूती व्यतिरिक्त याचा ऊद्धवजींना किंवा ठाकरे गटाला खूप काही फायदा होणार याची सुतराम शक्यता नाही, कारण तत्काळ याउलट फडणवीसांकडून प्रतिक्रिया/प्रत्युत्तर आलं, जे ओघाने येणारच, पण त्यांची "काडतूस" आणि "घुसेगा" शब्दफेक करतानाची छबी पाहिल्यावर अनेकांची पाचावर धारण बसली असेल ! विरोधकांच्या सोबत भाजपाच्यासुद्धा अनेकांना "चपराक" पेक्षा कमी नसावी. विरोधकांसाठी वापरलेली शैली आणि अशाही शैलीत फडणवीस बोलू शकतात यामुळे भाजपाच्या भविष्यातील इच्छूक उमेदवारांनाही हा "सूचक इशारा" ठरला आहे, जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत शिस्तित अन्यथा "खालच्या पातळीवर" जाता येते ही देहबोली म्हणजे "एका दगडात दोन पक्षी मारणे" सारखी आहे. 
------------------------------------------------------
FOLLOW www.newsmasala.in  NEWS MASALA, NASHIK
-------------------------------------------------------
 या "अस्राचा" वापर फडणवीस यांनी ज्या खुबीने केला तो येऊ घातलेल्या निवडणुकांतील विजयासाठी फायद्याचा ठरेल.  ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने विशेषणांनी भरलेली वाक्ये फेकली जातात पण ते फेकण्याची यशस्वी कला ठाकरे गटाकडे दिसत नाही किंवा जाणीवपूर्वक न दाखवण्याची काळजी घेतली जात आहे काय हा प्रश्न जनसामान्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही, आणि याला ज्या पद्धतीने विशेषण युक्त प्रत्युत्तर यायला हवे तसे येत नाही हा ठाकरे गटाचा खूप मोठा पराभव मानला जातोय, यांमुळे ठाकरे गटातील सैनिक मोठ्या संख्येने फडणवीसांवर एकीकडे जळत राहणार आणि भाजपा आपला अजेंडा राबवायला मोकळी असणार. म्हणूनच विरोधकांमध्ये फडणवीसांना "चाहने वाले कम होंगे तो चलेगा, लेकीन जलनेवालोंकी संख्या बढनी चाहिए !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!