गटविकास अधिकाऱ्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

   गटविकास अधिकाऱ्यासाठी लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !
      अहमदनगर::- ओंकार ईश्वर आवटे,  वय २५, ग्रामसेवक, वर्ग ३, चांदे खुर्द, ता- कर्जत याने तक्रारदाराकडे ७०००/-₹ लाचेची मागणी केली होती व प्रकरणमंजूरी पूर्व ५०००/- रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

     तक्रारदार हे शेतकरी असुन, त्यांनी शासनाच्या गाय गोठा योजने अंतर्गत अनुदानासाठी पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते, ते प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवक चांदे खु. यांनी तक्रारदार यांचेकडे ७०००/-₹ लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगर कडे प्राप्त झाली होती, त्यानुसार आज रोजी चांदे खुर्द गावी पडताळणी करण्यात आली, पडताळणी दरम्यान यातील आलोसे यांनी गट विकास अधिकारी कर्जत अमोल जाधव यांचे कडून सदर प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार यांचेकडे  अमोल जाधव यांचे करिता ७०००/-₹ लाचेची मागणी करून प्रथम ५०००/-₹ व काम झाल्यानंतर २०००/-₹ स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले, त्यानुसार आज रोजी चांदे खुर्द येथे लाचेचा सापळा आयोजित केला असता आलोसे यांनी पंचासमक्ष  तक्रारदार यांचे कडून ५०००/-₹ लाच रक्कम स्वीकारली असता त्याना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मिरजगाव पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
       सापळा अधिकारी शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर व सापळा पथक पोलीस अंमलदार पो.ना. रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, रवी निमसे, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक- दशरथ लाड, हारून शेख यांनी कार्यवाही केली, सदर कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, नरेंद्र पवार, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !