पोस्ट्स

मुलीच्या यशाची बातमी कानी पडताच आयसीयुत असलेल्या वडीलांची ऑक्सिजन पातळी १०० झाली !

इमेज
मुलीच्या यशाची बातमी कानी पडताच आयसीयुत असलेल्या वडीलांची ऑक्सिजन पातळी १०० झाली ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.      सिडको, ता. १४ : गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयातील आयसीयू मध्ये ऑक्सिजनवर असलेल्या वडिलांना जेव्हा मुलगी पोलीस भरतीत प्रथम आल्याची बातमी कानावर पडली तेव्हां त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९१ वरून चक्क १०० वर पोहचली. हा चमत्कार बघून तेथील उपस्थितांना अश्रूच अनावर झाल्याची हृदय द्रावक घटना बघायला मिळाली. सध्या या विषयाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.       प्रणिता शालिग्राम कुमावत, वय २६, शिक्षण एम. कॉम, रा. वाडजी मळा वाडी, खडकवासला, पुणे. येथील कुमावत परिवार हे तसे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तालुक्यातील आहेत. गावाकडे त्यांचे नावाला इंदिरा आवास योजनेतील एक घर आहे. काहीतरी चांगलं करून दाखवण्याच्या इच्छेनेच वडिलांनी लहानपणी गाव सोडले. सध्या ते पुण्यात वन रूम किचन च्या घरात राहतात. त्यांच्या परिवारात आई-वडील, एक मोठा भाऊ व वहिनी असे सदस्य आहेत. भाऊ सध्या वेगळा राहतो. वडिलांचा इलेक्ट्रिशियन चा व्यवसाय आहे. त्यावर ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. पॅरेलीस

सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

इमेज
सैनिक कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801. नाशिक (नांदगाव)::- येथे मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ या दिवशी सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त नांदगाव तालुका अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  खैरनार वस्ती येथील सर्व मुलांना शालेय बैग, वह्या, पेन, पेन्सील, ईतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन व विरमाता-पिता, वीरनारी, आजी-माजी सैनिक, सैनिक परीवार यांचा सत्कार करण्यात आला.            संस्थेचे पदाधिकारी व प्रमुख सरकारी अधिकारी यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष संजय गोविंद खैरनार, व मुख्याध्यापक रमेश अहिरे यांच्या नियोजनाद्वारे शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत पुष्पवर्षाव, ढोल व टाळ्या  वाजवून करण्यात आले.    याप्रसंगी प्रमुख अतिथी नवनाथ पगार संस्थापक अध्यक्ष सैनिक कल्याण सेवाभावी संस्था नाशिक महाराष्ट्र राज्य व सरकारी अधिकारी, संदिप दळवी सहगटविकास अधिकारी नांदगाव यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पु

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता अरूण कदम यांच्या हस्ते खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी !

इमेज
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता अरूण कदम यांच्या हस्ते खीर वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने वैशाली फाऊंडेशन आणि संघटित ग्रूप मुंबई खार पचिम मुंबई येथे दोन हजार बांधंवाना खीर वाटण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम तसेच त्यांची कन्या सुकन्या कदम-पोवळे, राहुल राजेंद्र रूके, चेतन अशोक मोहिते, गौरव नानू जाधव, मयुरेश मुकेश जाधव, रूपेश जाधव, प्रथमेश सावंत उपस्थित होते.

तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !          नासिक::- सलीम अकबर तडवी , वय-४४ वर्ष, तलाठी, (वर्ग३) सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, कविता नंदु सोनवणे, वय-२७ वर्ष, (वर्ग ४) महिला कोतवाल, मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालय यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले आहेत. सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर स्वतः तक्रारदार यांचे व सोबत ईतर ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.१ व २ यांनी २५००/रु.लाच रकमेची मागणी केलेली होती त्यापैकी दिनांक-११/०४/२०२३ रोजी आलोसे क्रं.१ यांनी तक्रारदाराकडून जागेवरच १,०००/- रुपये घेतलेले होते व उर्वरीत रक्कम १५००/-रुपये लाच रकमेची मागणी करीत असले बाबत तक्रारदाराच्या तक्रारीची आज दिनांक-१४.४.२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे क्रं.१ व २ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५००/- रुपये लाच रकमेची मागणी केली

अभियांत्रिकी विभागातील प्रस्तावित सेवा नियमांविरुद्ध अभियंत्यांमध्ये असंतोष !

इमेज
अभियांत्रिकी विभागातील प्रस्तावित सेवा नियमांविरुद्ध अभियंत्यांमध्ये असंतोष ! मागणी मंजूर न झाल्यास मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801       नाशिक(प्रतिनिधी)::- अभियांत्रिकी सेवेचे नियम दिनांक १५/१२/१९७० वर्षा पूर्वीचे जुने आहेत. नियम, तत्कालीन कार्य स्थिती व तद्नुरूप सेवा स्थितीस पर्याप्त होते. आजच्या सेवा स्थितीला व कार्यप्रकाराला पूरक, उच्च तंत्रज्ञानाच्या अवलंबन आणि उद्याच्या आव्हानाला सामोरे जाणारे नियम तयार करण्याची अनिवार्यता आहे असे राजपत्रित अभियंता संघटनेचे प्रमुख सल्लागार सुभाष चांदसुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा ऊर्जा, जलसंधारणादि अभियांत्रिकी विभागात सर्व स्तरीय अभियंत्यांचे सेवा संवर्धनास पोषक सेवा नियम तयार करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. आमच्या मागणीला सरकारच्या वतीने प्रतिसाद मिळाला नाही तर मुंबईत संघटनेचे पदाधिकारी, सदस्य धरणे आंदोलन करतील.         अभियंत्याच्या एकूण सेवेमध्ये तीन पदोन्नत्या मिळायला हव्यात मात्र याची अंमलबजावणी होत नाही. उप अभियंता पद सरळ सेवेने भरण्याची तरतूद

केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्यामंदिराचा प्रथम मासिक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न !

इमेज
केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्यामंदिराचा प्रथम मासिक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिर या इंग्रजी माधमाच्या शाळेच्या मासिक अंकाचा प्रकाशन सोहळा १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता तरुण साहित्यिक अनुज केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्या मंदिरा शाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या, शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आणि  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.           अहिल्या विद्यामंदिर शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या या प्रथम मासिक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रमोद मोरजकर यांनी भूषवले तर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तरुण साहित्यिक अनुज केसरकर हे  उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी बोलताना केसरकर यांनी शाळेच्या प्रथम मासिक प्रकाशनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले व आपल्या कवितेतून  शाळा आणि  गुरूंची महती अधोरेखित केली.           गिरणगावातील ही शाळा शिक्षणा सोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्म आणि बौद्धिक

२५००० रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
२५००० रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !  नासिक::- आलोसे नितीन सगाजी मेहेरखांब, वय -४२ वर्ष, ग्रामसेवक, पाथरे, ता. सिन्नर याने ५००००/-₹ लाचेची मागणी केली होती त्यातील २५०००/- ₹ पहिला हप्ता स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.               तक्रारदार यांचे पाथरे, खु ll. ता. सिन्नर, जि. नाशिक येथे गावठाण हद्दीत जुने घर असून त्यांनी सदर घराचा काही भाग व ओटा तोडून दोन मजली इमारत बांधले असून, सदर गावठाण मधील इमारतीची नोंद करून व इमारतीची ग्रामपंचायत प्रमाणे घराची घरपट्टी ठरवून देण्याचे मोबदतल्यात आलोसे नितीन मेहेरखांब, ग्रामसेवक, सजा पाथरे यांनी दि.१२/०४/२०२३ रोजी ५०,०००/-₹ लाचेची मागणी करून त्याचा पहिला हफ्ता २५,०००/- ₹  दि.१२/०४/२०२३  रोजी स्वीकारली असता  त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.        सापळा अधिकारी श्रीमती साधना इंगळे, पोलीस निरीक्षक, सापळा पथकातील पो. हवा.सचिन गोसावी, पो. हवा. प्रफुल्ल माळी, चालक.पो.ना.परशुराम जाधव यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस

शेतीत रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जीवनमान धोक्यात-ब्रह्माकुमारी पूनम दीदी

इमेज
शेतीत रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जीवनमान धोक्यात-ब्रह्माकुमारी पूनम दीदी पिंपळनारे येथील ऍग्रो सर्च कंपनीत कामगारांसाठी शिबिराचे आयोजन ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801       नाशिक(प्रतिनिधी)::-  आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्करोगाने पीडित रुग्णांचे प्रमाण वाढत असुन शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा बेसुमार वापर वाढल्याने होणारे दुष्परिणामाविषयी चर्चा करण्यात आली. यावर उपाययोजना ब्रह्माकुमारी संस्था शेतकरी आणि शेतीसाठी शाश्वत, सेंद्रिय आणि योगिक शेतीसारखे प्रयोग करत असुन याचा प्रसार प्रचार सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी नाशिक जिल्हा मुख्य सेवा केंद्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.      दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील ऍग्रो सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत राजयोग शिबिर कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे आणि ब्रह्माकुमार रामनाथ भाई उपस्थित होते       यावेळी पुढे बोलताना ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सर्व स्टॉफला ब्रह्माकु

ठेकेदार, पुरवठादार काळ्या यादीत टाकले जाण्याच्या भीतीने आरोप व बदनामी करीत आहेत ! सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत, सामाजिक न्याय विभाग व सचिवांवर खोटे, दिशाभूल करणारे बिनबुडाचे आरोप, सचिवांचा निर्वाळा व खुलासा !

इमेज
ठेकेदार, पुरवठादार काळ्या यादीत टाकले जाण्याच्या भीतीने आरोप व बदनामी करीत आहेत !   सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या सर्व योजना चालू आहेत, सामाजिक न्याय विभाग व सचिवांवर खोटे, दिशाभूल करणारे बिनबुडाचे आरोप, सचिवांचा निर्वाळा व खुलासा ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801           मुंबई (दि.११)::- सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजना चालू आहेत, बार्टीच्या प्रशिक्षणाच्या  व इतर चालु असलेल्या कोणत्याही योजना बंद करण्यात आलेल्या नाहीत, मात्र राज्यातील सर्व सामान्य जनतेमध्ये/समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती ठराविक संघटना व लोकांकडून दिली जात असून आंदोलने करण्यात येत आहेत. सचिव, सामाजिक न्याय विभाग यांच्या विरोधात निवेदने दिले जात आहेत. त्याचप्रमाणे विविध प्रसार माध्यमातून देखील जनतेची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात येत आहेत. हे सर्व आरोप सचिव सुमंत भांगे यांनी फेटाळले असून त्यात कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसल्याचा निर्

वज्रमुठीने काहीही फरक पडत नाही ! सत्ता मिळविणे हाच मविआचा विचार ! खिजगणतीत कोण, हे काळ ठरवेल ! प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

इमेज
वज्रमुठीने काहीही फरक पडत नाही ! सत्ता मिळविणे हाच मविआचा विचार ! खिजगणतीत कोण, हे काळ ठरवेल ! प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा  न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801      जळगाव::- महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष देशाच्या विकासासाठी किंवा राष्ट्रप्रथम या विकासाने एकत्र आलेले नाहीत तर त्यांचा एकमेव हेतू केवळ सत्ता मिळविणे हाच आहे. त्यामुळे वज्रमूठ जाड झाली की सैल झाली याने कोणताही फरक पडत नाही, जनता सगळे ओळखून आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.       जळगाव जिल्हा संघटनात्मक प्रवासात ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी विरोधकांच्या कुरघोडीच्या राजकारणावरून टीका केली. ते सत्तेत व आम्ही विरोधी पक्षात असताना महाराष्ट्राला क्रमांक एक वर आणण्यासाठी प्रयत्न करीत होतो. सरकारला योग्य सूचना देणे, सरकारला मदत करणे. आता केवळ सकाळी उठून टीका केली जाते.         एकनाथ खडसे हे भाजपात परत येण्याविषयी माझ्याकडे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोललेले नाहीत. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांनी भाजपासाठी मोठे काम केले आहे असेही बावनकुळे म्हणाले.   कॉंग्रेसने मुस्