शेतीत रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जीवनमान धोक्यात-ब्रह्माकुमारी पूनम दीदी

शेतीत रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जीवनमान धोक्यात-ब्रह्माकुमारी पूनम दीदी

पिंपळनारे येथील ऍग्रो सर्च कंपनीत कामगारांसाठी शिबिराचे आयोजन !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

      नाशिक(प्रतिनिधी)::- आज मोठ्या प्रमाणामध्ये कर्करोगाने पीडित रुग्णांचे प्रमाण वाढत असुन शेतीत रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा बेसुमार वापर वाढल्याने होणारे दुष्परिणामाविषयी चर्चा करण्यात आली. यावर उपाययोजना ब्रह्माकुमारी संस्था शेतकरी आणि शेतीसाठी शाश्वत, सेंद्रिय आणि योगिक शेतीसारखे प्रयोग करत असुन याचा प्रसार प्रचार सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी नाशिक जिल्हा मुख्य सेवा केंद्राच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले.

     दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथील ऍग्रो सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत राजयोग शिबिर कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे आणि ब्रह्माकुमार रामनाथ भाई उपस्थित होते
      यावेळी पुढे बोलताना ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी सर्व स्टॉफला ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याविषयी सखोल माहिती देत मनाची स्थिरता व एकाग्रता वाढवण्यासाठी ब्रह्माकुमारीद्वारे दिल्या जाणाऱ्या ध्यान-धारणेची आवश्यकता स्पष्ट करत राजयोगाचे फायदे विशद केले. अध्यात्म ज्ञानासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात विनामूल्य प्रवेश घेत कोर्स करण्याचे आवाहन केले.

यावेळी कंपनी व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे यांनी आपल्या मनोगतात ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करत कंपनीतील सर्व कामगार कोर्स करणार असल्याचे सांगितले. तसेच कंपनीतील २० कामगार माउंट आबू, राजस्थान येथे होणाऱ्या राजयोग शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी तपोवन, माउंट आबू योगिक शेती विभाग सदस्य ब्रह्माकुमार रामनाथ भाई यांनी आपला अनुभव व्यक्त करत सेंद्रिय शेती किती महत्त्वाची त्याची आवश्यकता याबाबत माहिती दिली.यावेळी आभार रामनाथ भाई यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।