मुलीच्या यशाची बातमी कानी पडताच आयसीयुत असलेल्या वडीलांची ऑक्सिजन पातळी १०० झाली !

मुलीच्या यशाची बातमी कानी पडताच आयसीयुत असलेल्या वडीलांची ऑक्सिजन पातळी १०० झाली !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.

     सिडको, ता. १४ : गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयातील आयसीयू मध्ये ऑक्सिजनवर असलेल्या वडिलांना जेव्हा मुलगी पोलीस भरतीत प्रथम आल्याची बातमी कानावर पडली तेव्हां त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९१ वरून चक्क १०० वर पोहचली. हा चमत्कार बघून तेथील उपस्थितांना अश्रूच अनावर झाल्याची हृदय द्रावक घटना बघायला मिळाली. सध्या या विषयाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

      प्रणिता शालिग्राम कुमावत, वय २६, शिक्षण एम. कॉम, रा. वाडजी मळा वाडी, खडकवासला, पुणे. येथील कुमावत परिवार हे तसे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर या तालुक्यातील आहेत. गावाकडे त्यांचे नावाला इंदिरा आवास योजनेतील एक घर आहे. काहीतरी चांगलं करून दाखवण्याच्या इच्छेनेच वडिलांनी लहानपणी गाव सोडले. सध्या ते पुण्यात वन रूम किचन च्या घरात राहतात. त्यांच्या परिवारात आई-वडील, एक मोठा भाऊ व वहिनी असे सदस्य आहेत. भाऊ सध्या वेगळा राहतो. वडिलांचा इलेक्ट्रिशियन चा व्यवसाय आहे. त्यावर ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. पॅरेलीसिसचा झटका आल्याने ते सध्या पुण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुलीने पोलीस व्हावं अशी त्यांची खूप इच्छा. घरातील मंडळींचा विरोध झुगारून त्यांनी गरुड झेप करिअर अकॅडमी मध्ये प्रणिताचा २०१८ ला प्रवेश करून दिला. अवघ्या सहा महिन्यात प्रणिता आसाम रायफल ची परीक्षा उत्तीर्ण झाली. परंतु कागदपत्रे कमी असल्याने अपयश आल.  त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात एसएससीजीडी च्या परीक्षेत यशाच्या जवळ पोहोचली. परंतु कोरोनामुळे पुन्हा एकदा अपयश आले. धुळ्यात झालेल्या पोलीस भरतीत अवघ्या एका मार्काने नशिबाने हुलकावणी दिली. डिप्रेशन आल्याने अखेर ती घरी परतली. वडिलांनी पुन्हा एकदा तिच्यावर विश्वास दाखविला. एक वर्षानंतर पुन्हा एकदा करिअर अकॅडमीत प्रवेश घेतला.  अकॅडमी चे संचालक प्रा. डॉ. सुरेश सोनवणे यांनी प्रणिताला हिम्मत दिली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सोलापूर येथील पोलीस भरतीच्या जागा निघाल्या. त्यात मैदानी चाचणीत यश संपादन केले. त्या दरम्यान वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्याच्या रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तब्बल दोन लाख ५५ हजार रुपये खर्च आला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईस आली होती. सोलापूर येथे पोलीस भरतीची लेखी परीक्षा होती. तेथे राहण्यासाठी पैसै नसल्याने रात्रीचा प्रवास करून दिवसा परीक्षा दिली. आणि पुन्हा एकदा वडिलांच्या रूग्ण सेवेत हजर झाली. अचानक एके दिवशी एन.टी. ब प्रवर्गातून आपण प्रथम आल्याचे कळाले. आणि ही बातमी प्रथम वडिलांच्या कानावर टाकण्यासाठी रुग्णालयात तातडीने धाव घेतली. त्यावेळी आय सी यू मध्ये असलेल्या वडिलांची ऑक्सिजन लेव्हल ९१ इतकी होती. ही बातमी वडिलांच्या कानावर पडताच चमत्कार झाला. गोड शब्द ऐकून वडिलांची ऑक्सिजन लेव्हल अचानक १०० इतकी झाली. तिथे उपस्थित असलेल्या रुग्ण, कर्मचारी, डॉक्टर व नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वांना अश्रू अनावर झाले. पप्पा माझी ट्रेनिंग आहे. आणि तुम्हाला मला सोडवायला यायचे आहे. त्याकरता तुम्हाला बरं व्हावं लागेल. अशी मुलगी आस्थेने म्हणाली. आणि वडिलांनी होकारार्थी मान हलवताच सर्वांना हायसे झाले. त्यामुळे आता पप्पा बरे होतील. अशी काहीशी आशा प्रणिता व तिच्या आईला लागली. हा आनंदाचा क्षण बघून उपस्थित सर्वांनच्याच डोळ्यात आनंदाचे अश्रू बघायला मिळाले. प्रणीताची ही संघर्षमय यशाची कहाणी ऐकून अनेक जणांना प्रेरणा मिळेल. अशी अपेक्षा बाळगूया !
**********************************
 मी आज पास झाले. खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. माझ्या पास होण्याने आजारी असलेल्या वडीलांची ऑक्सिजन लेवल ९१ वरून शंभर झाली. हा एक चमत्कारच झाला. अकॅडमी व त्यांचे संचालक यांचे मी मनापासून आभार मानते.
        प्रणिती कुमावत, 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!