तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

तलाठी व कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

         नासिक::- सलीम अकबर तडवी , वय-४४ वर्ष, तलाठी, (वर्ग३) सजा निंभोरा व प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बु ll, कविता नंदु सोनवणे, वय-२७ वर्ष, (वर्ग ४) महिला कोतवाल, मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालय यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. यातील तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमिन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे वडील मयत झालेले आहेत. सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर स्वतः तक्रारदार यांचे व सोबत ईतर ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.१ व २ यांनी २५००/रु.लाच रकमेची मागणी केलेली होती त्यापैकी दिनांक-११/०४/२०२३ रोजी आलोसे क्रं.१ यांनी तक्रारदाराकडून जागेवरच १,०००/- रुपये घेतलेले होते व उर्वरीत रक्कम १५००/-रुपये लाच रकमेची मागणी करीत असले बाबत तक्रारदाराच्या तक्रारीची आज दिनांक-१४.४.२०२३ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आलोसे क्रं.१ व २ यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५००/- रुपये लाच रकमेची मागणी केली. व सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः आलोसे क्रं.१ यांनी आलोसे क्रं.२ यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष मौजे भोरटेक बुll तलाठी कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे वर नमुद दोन्ही आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. 

        सापळा व तपास अधिकारी शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव, सह सापळा पथक पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, व कारवाई मदत पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर, यांनी पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर  पोलीस अधीक्षक, एन.एस.न्याहळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!