केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्यामंदिराचा प्रथम मासिक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न !

केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्यामंदिराचा प्रथम मासिक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न !

न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801

      मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : काळाचौकी येथील अहिल्या विद्यामंदिर या इंग्रजी माधमाच्या शाळेच्या मासिक अंकाचा प्रकाशन सोहळा १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता तरुण साहित्यिक अनुज केसरकर यांच्या हस्ते अहिल्या विद्या मंदिरा शाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या, शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आणि  विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

          अहिल्या विद्यामंदिर शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या या प्रथम मासिक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रमोद मोरजकर यांनी भूषवले तर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तरुण साहित्यिक अनुज केसरकर हे  उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्यावेळी बोलताना केसरकर यांनी शाळेच्या प्रथम मासिक प्रकाशनाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच कर्मचारी वृंदाचे अभिनंदन केले व आपल्या कवितेतून  शाळा आणि  गुरूंची महती अधोरेखित केली.


          गिरणगावातील ही शाळा शिक्षणा सोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, अध्यात्म आणि बौद्धिक विकासात मुलांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणते आहे. त्याबद्दल केसरकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका कृतीका मोरजकर यांचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका कृतिका मोरजकर यांनी विद्यार्थ्यानी या मासिकात लिहिलेल्या कवितांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
            गिरणगावात मोठ्या कष्टाने उभी राहिलेली ही शाळा आज सर्वच क्षेत्रात दैदीप्यमान अशी वाटचाल  करत आहॆ त्या वाटचालीत येथील शिक्षक, मुख्याध्यापक यांचे योगदान विषद करतानाच विद्यार्थी यांचे  मनःपूर्वक अभिनंदन केले. पाहुण्यांचा सत्कार विद्यार्थ्यांचे सादरीकरण अशा उत्साहात पार पडलेल्या या मासिक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सलमा खान, कु. मेरील टिक्सेरा, नूतन माने यांनी केले. यावेळी संदीप गुरव, सलीम शेख यांच्यासोबत शाळेचे सर्व शिक्षकगण व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!