पोस्ट्स

जळजळीत टीका ! उद्धवराव, नाकर्त्या कारभाराबद्दल आधी महाराष्ट्राची माफी मागा - गिरीष पालवे

इमेज
जळजळीत टीका ! उद्धवराव, नाकर्त्या कारभाराबद्दल आधी महाराष्ट्राची माफी मागा - गिरीष पालवे          नाशिक - भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीष पालवे यांची जळजळीत टीका ! कोविड महामारीच्या काळात देशात सर्वात जास्त कोविड मृत्यू महाराष्ट्रात झाले. ठाकरे सरकारच्या वसुलीबाज कारभाराला कंटाळून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. सरकारी अनागोंदीमुळे महाराष्ट्र रसातळाला गेला तरी अजूनही उद्धव ठाकरे आपल्या नाकर्त्या कारभाराबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आपल्या नाकर्त्या, भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागा आणि सत्ता असतानाही घरी बसलात तसे घरीच बसा, अशी जळजळीत टीका भाजपा चे गिरीष पालवे यांनी केली आहे. स्वतःवर स्तुतिसुमने उधळण्याच्या या आत्मकेंद्री स्वभावामुळेच आज ठाकरे यांनी पक्ष, चिन्ह, निष्ठावंत कार्यकर्ते गमावले आहेत, असेही गिरीष पालवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.           पाचोरा ( जि. जळगाव )  येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाषणाची जुनी टेप वाजविली. पंचवीस वर्षे राजकारणात असूनदेखील आजही स्वतःचे स्थान किंवा कर्तृत्व दाखविता न आल्याने दिवंगत पित्याच्या पुण्याईवर लोका

पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही ! "शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम !

इमेज
पोलिस व अधिकारी म्हणतात "अजून कुठे काही दिसत नाही !" शिंदे गटाच्या गाड्या पद्धतीशीर राज्याबाहेर कशा गेल्या ? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम !         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून संपूर्ण महाराष्ट्रालाच धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं शिवसेनेचे आमदार महाराष्ट्राबाहेर पडत होते, पण याची कुणालाच कल्पना नव्हती. शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर पडत असताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. हे सर्व कसं घडलं? याबाबत अद्याप संदिग्धता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता जवळपास दहा महिने उलटली आहेत.                 या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. शिंदे गटाच्या गाड्या महाराष्ट्राबाहेर कशा गेल्या ? याचा नेमका घटनाक्रम अजित पवारांनी सांगितला.             एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आम्हाला लागली होती. या बाबी आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या का

नुकतेच लग्न झालेल्या मुलीस पित्याचे पत्र ! पती सैन्यदलात असल्याने राज्याबाहेर बदली होऊ शकते जिथे कुठे असशील तिथे "साप्ताहिक न्यूज मसाला" वाचनात ठेव.

इमेज
नुकतेच लग्न झालेल्या मुलीस पित्याचे पत्र ! पती सैन्यदलात असल्याने राज्याबाहेर बदली होऊ शकते जिथे कुठे असशील तिथे "साप्ताहिक न्यूज मसाला" वाचनात ठेव. प्रिय सौ.उमा , तुझ्या आई आण्णा कडून अनेक उत्तम आशीर्वाद.       आता तुझे उमा काळे हे नाव बदलून सौ. उमा ओंकार हाडके असे झाले आहे. २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी नाशिकला लक्षिका मंगल कार्यालयात भारतीय सैन्यदलात अधिकारी असलेले श्री. ओंकार यशवंत हाडके राहणार पुणे यांच्याही तुझा विवाह झाला.  कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असल्याने पुण्यात नोकरी करीत असलेल्या तुला नाशिकला येऊन कुटुंबात राहता आले. बारावी नंतर जवळपास सात वर्षे पुण्यात शिक्षण व नोकरी असल्याने पंधरा दिवसातून एकदा तू नाशिकला येत होती. आई वडील, आजी, काका काकू चुलत भावंडे योगेश व गौरी व काकूचे वडील आम्हा सर्वांना आनंद होत असे. एकुलती एक लेक असल्याने तुला पूर्ण स्वातंत्र्य होते, मोकळीक होती, त्याचा तू कधी गैरफायदा घेतला नाही. कौटुंबिक चौकटीत राहताना छोटे आनंद, वाचन, नृत्यकला, पर्यटन असे छंद जोपासताना तुझ्यात नवीन गोष्टी शिकण्याचा व करण्याचा प्रचंड उत्साह आहे.        मदतीची भावना जागृ

महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या राकेशचा दुर्देवी अपघात,,,,,,,,, परिसरात हळहळ..!

इमेज
महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या राकेशचा दुर्देवी अपघात,,,,,,,,, परिसरात हळहळ..! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,  महेश‌ शिरोरे          खामखेडा (प्रतिनिधि)::- शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा येथे घडली आहे. राकेश दिनेश धोंडगे अशी मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.       मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी दि.२२ रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी  झाल्याने त्यात तो दबला गेला. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित क

सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण होणे काळाची गरज, गुणवत्तेच्या आधारे कार्य सिद्ध करा-समाज कल्याण आयुक्त

इमेज
सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण होणे काळाची गरज, गुणवत्तेच्या आधारे कार्य सिद्ध करा-समाज कल्याण आयुक्त न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.            नाशिक (दि.२३)::- समाजात कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपल्यात असलेल्या गुणवत्तेच्या आधारे स्वतःला सिद्ध करून आपला सामाजिक कार्याचा ब्रँड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.           अत्त दीप भव: मेडिकोच सोशल वेलफेअर असोसिएशन नाशिक यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित "क्रांतीचा साक्षीदार" या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते कालिदास कलामंदिर येथे झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अत्त दीप भव: मेडिकोच सोशल वेलफेअर असोसिएशनच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.            सदर कार्यक्रमास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तसेच क्रांतीचा साक्षीदार नाट्याचे दिग्दर्शक रुपेशकुमार निकाळजे, डॉ.जे.एल.वा

मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे ! आयएमएच्या महिला विभागातर्फेरविवारी वारली चित्रशैली कार्यशाळा !

इमेज
मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे  ! आयएमएच्या महिला विभागातर्फे रविवारी वारली चित्रशैली कार्यशाळा ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.         नाशिक ( प्रतिनिधी )::-  मन सुदृढ व आरोग्य चांगले रहाण्यासाठी एखादा छंद, कलेत मन गुंतवावे असा सल्ला डॉक्टर्स नेहमीच देतात. त्यासाठी प्रशिक्षण घेतले तर उत्तम  कलानिर्मिती करता येते. स्वतः आनंद मिळवून तो इतरांपर्यंत पोहोचवता येतो. याच उद्देशाने इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए ) नाशिक शाखेच्या महिला विभागातर्फे जगप्रसिद्ध वारली चित्रशेैली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.     रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत ही कार्यशाळा होईल. आयएमए हॉल, शालिमार येथे होणाऱ्या या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुलीमुली व सगळ्या वयोगटातील स्त्रीपुरुष  कलाप्रेमींना सशुल्क सहभागी होता येईल. वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, मराठी - इंग्रजी नोट्स व सर्टिफिकेट देण्यात येईल. येतांना पेन्सिल, पाण्यासाठी बाउल, जुना रुमाल व पॅड आणावे. प्रवेशासाठी दि

तरुणांनी `नोकरी देणारे' उद्योजक व्हावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

इमेज
‘स्टार्ट अप’च्या माध्यमातून तरुणांनी `नोकरी देणारे' उद्योजक व्हावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील          मुंबई( दि. २२)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या कौशल्य विकास योजना व स्टार्ट अप योजना ( startup ) यांचा समन्वय साधून नवउद्योजक तरुणांना रोजगारनिर्मीतीची संधी उपलब्ध केली आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणांनी नोकरी करण्याऐवजी नोकरी देणारे नवउद्योजक होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी केले.          ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथे अॅचिव्हर्स कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषद यांच्या वतीने स्टार्टअप, इनक्यूबेशन आणि एंटरप्रेनरशिप या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बोलताना पाटील यांनी हे आवाहन केले. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, डॉ. महेश भिवंडीकर, प्राचार्य अविनाश पाटील, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. बी. तायवडे, कार्यकारी अध्यक्ष डॉ. टी. ए. शिवारे, आदी या वेळी उपस्थित होते.               १५ ऑगस

मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !      नासिक ::- सिन्नर नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी संजय केदार यांस नासिक च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी बदली झालेली असून सध्या कुठे नेमणूक मिळालेली नाही, तक्रारदाराची बांधकाम मंजूरी ची फाईल सहा महिन्यांपासून अडवून ठेवली होती. नगरपरिषदेतून कार्यमुक्त झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याने फोन करून पाच हजार रुपयांची मागणी सतत केली होती. वारंवार झालेल्या फोनवरील संभाषणानुसार लाचलुचपत विभागाच्या सदर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत आहे. 

चमत्कारच, एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते ! -- देविदास पिंगळे

इमेज
चमत्कारच, एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते ! -- देविदास पिंगळे जिल्हा बँकेची परिस्थिती झाली तशी बाजार समितीची होऊ देऊ नका -- माजी खासदार पिंगळे न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक, 7387333801.     शिलापूर(प्रतिनिधी)::- मागील तीन वर्षांत नाशिक बाजार समितीत मोठा भ्रष्टाचार केला असून स्वमालकीच्या गाडीत देखील टायर आणि डिझेल, पेट्रोल बाजार समितीच्या पैशातुन टाकले आहे तर एकाच वेळी दोन गाड्यातून चेअरमन फिरत होते हा चमत्कारच म्हणावे लागेल, असा खोचक टोला देत मी चेअरमन असताना एका रुपायांचे जरी स्वमालकीच्या गाडीत पेट्रोल, डिझेल टाकलेले दाखवा त्या क्षणाला माघार घेईल असे प्रतिपादन आपलं पँनलचे नेते तथा माजी खासदार देविदास पिंगळे यांनी करत मागील काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी परिस्थिती झाली तशी नासिक बाजार समितीची होऊ द्यायची नसेल तर आपलं पँनलच्या उमेदवारांना बाजार समितीवरती पाठवण्याचे आवाहन केले.            नाशिक बाजार समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी येत्या२८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असुन त्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून आपलं पँनलचे नेते पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली नि

आखाजीले जाणंच पडी वं माय ! गाड्यासले कितली भी गर्दी राहो !व्हिडिओ बघायलाच हवा !!

इमेज
आखाजीले जाणंच पडी वं माय ! गाड्यासले कितली भी गर्दी राहो ! व्हिडिओ बघायलाच हवा !! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक,  7387333801 https://youtu.be/05CMLHAEcL8 वरील लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा      नासिक::- अक्षयतृतीयेला नासिक हून मालेगाव, धुळे, शिरपूर तसेच खानदेशातील अनेकांना गांवी जाण्याची ओढ असते यांसाठी एनकेन प्रकारे पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातात, अशाच गर्दीने काल ठक्कर बाजार येथील बसस्थानकावर प्रवाशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, बसमध्ये जागा मिळविण्यासाठी केलेली धडपड व आखाजीला गांवी जायचेच याचा व्हिडिओ फक्त न्यूज मसाला, नासिक वर.         या गर्दीचे नियोजन करताना स्थानकप्रमुख रावणकोळ यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दहा ते बारा जादा गाड्या पाठविल्या, यामुळे प्रवाशांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.