पोस्ट्स

आषाढी स्पेशल (१४), उभा निवांत तू आत, विठ्या लाज नाही तुला !! अमृता खंडेराव

इमेज
आषाढी स्पेशल (१४), उभा निवांत तू आत, विठ्या लाज नाही तुला !! अमृता खंडेराव             !! पंढरी@आषाढी !! दर्शनाची रेटारेटी जागोजागी खेटाखेटी ! कोर्या लुगड्याचा वास जीव झाला कासाविस !!                पोटी कालवाकालव                मन भक्तीमधी रंगे !                भूक वरवर चढे                पोटातल्या आम्लासंगे !! अशा दाटल्या गर्दीत धटिंगण मेला रेटे ! रांगमोड्या भाविकाला देव सर्वाआधी भेटे !!               लांब चालत मी आले               चिंध्या जिवाच्या जाहल्या !               उभा निवांत तू आत               विठ्या लाज नाही तुला !!         __अमृता खंडेराव.

आषाढी स्पेशल, प्रमोद सुर्यवंशी लिखित कवाली भक्ती गीत- "विठ्ठल माऊली" !

इमेज
आषाढी स्पेशल, प्रमोद सुर्यवंशी लिखित कवाली भक्ती गीत- "विठ्ठल माऊली" !                               !! विठ्ठल माऊली !! विठ्ठल माऊली माऊली विठ्ठल माऊली माऊली विठ्ठल    ....... (कोरस ) $$,........ तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता     साऱ्या जगाला तूच हो तारता        साऱ्या जगाला तूच हो तारता ......    विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली           विठ्ठल माऊली .... (कोरस)  .... ।। धृ ।। तूच हो आमचा दाता, तूच हो आहे विधाता,    तुझ्या चरणावरती ठेवी तो आम्ही माथा ...(२)          ठेवी तो आम्ही माथा ...(३)             (कोरस) तोड :- हो ...$$$ तूच हो बंधू सखा तूच आहे भोळा  ,     माया दयाळू तूच सावळा ... २ विठ्ठल माऊली ..... (कोरस) ... ।। १ ।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ....... (कोरस) युगे अठ्ठावीस उभा तू विठेवर ,  चंद्रभागेच्या राही सदा तू कठेवर .... २     सदा तू कठेवर .... (कोरस) तोड:- पाप सारे आपले धुहुनीय जाई, पुण्याची किमया अवतार घेई ..      पुण्याईची किमया अवतार घेई.... ( कोरस) विठ्ठल माऊली माऊली ही विठ्ठल माऊली ।।२।।           __प्रमोद न. सूर्यवंशी                  मुंबई

आषाढी स्पेशल, "आस" विठ्ठल दर्शनाची ! "झेंडा रोवला आता, सुटो ही देहगाथा . . .!" अनघा धोडपकर

इमेज
आषाढी स्पेशल, "आस" विठ्ठल दर्शनाची ! "झेंडा रोवला आता, सुटो ही देहगाथा . . .!" अनघा धोडपकर                     !!  आस  !! नाचत गात आला हा वारकरी पंढरपुरी  भक्तजनांनी साधली किमया अलंकापुरी  नामाचा गजर वाहे भिमातीरी  भजनाला रंग आला बहुअंतरी  जल्लोशात आली दिंडी ही मनमंदिरी . . . . . .  घेतला विसावा देखियला डोळा विठ्ठल   अंतरी दाटला सारा भाव कल्लोळ  आनंदाने घेतली भेट नाम पायरीवरी . . . .  करावा उध्दार हा भाव अर्पिला चरणी  आस न राहिली मागे बोले करुणी  झेंडा रोवला आता सुटो ही देहगाथा . . . . .                __अनघा धोडपकर...

आषाढी स्पेशल, डॉ. अंजना भंडारी म्हणतात "अनाथांना घेऊनी कडेवर, स्वतः विठ्ठल बनून पहावे" !

इमेज
आषाढी स्पेशल, डॉ. अंजना भंडारी म्हणतात "अनाथांना घेऊनी कडेवर, स्वतः विठ्ठल बनून पहावे" !                  !! आषाढ वारी !! नेहमीच येते आषाढ वारी जमून येतात काळे ढग ! विठ्ठलाच्या भेटी साठी उतावीळ होतो प्रत्येक जन !!             तो घेतो टाळ मृदंग             ती गाते सुरेख अभंग !             दिंडी पताका खांद्यावरती             क्षणभराची नसे उसंत !! भक्ती पूर्ण वारी होते  जीवाशीवाची भेट घडते ! रस्त्यामधुनी माणुसकीच्या  विठ्ठलाचे दर्शन घडते !!             पानोपानी झाडांवर            थेंब आडकतो असा !            काळ्या आईच्या कुशीत पडतो             टाळ वाजवावा जसा !! काळ्या मातीतून अंकुर फुटतो जणू विठ्ठल शेला पांघरतो ! कुठे दुरवर फुलतात फुले शेत जणू पताका घेऊनिया डुले !!             सुख दुःखाला ठेवुनीया दूर             वारीत एकदा जाऊन पहावे !             अनाथांना घेऊनी कडेवर               स्वतः विठ्ठल बनून पहावे !!         __डॉ. अंजना भंडारी             नाशिक

आषाढी स्पेशल, आरती डिंगोरे यांची स्वरचित "थवा वैष्णवांचा नाचतसे " !

इमेज
आषाढी स्पेशल, आरती डिंगोरे यांची स्वरचित "थवा वैष्णवांचा नाचतसे " !             !! थवा वैष्णवांचा !! घेऊनी पताका वैष्णव निघती, जयांच्या संगती पांडुरंग...           पाऊले चालती वाट पंढरीची,           गाठ संसाराची सोडूनिया... डोईवर शोभे तुळस ती छान, ठेवी संतुलन निसर्गाचे...            टाळ विणा हाती भक्तीगीत गाती,            महिमा वर्णिती पंढरीचा... अबीर गुलाल उधळती सारे, भक्तिमय वारे चोहीकडे...           ब्रम्हांडी निनादे गजर हरीचा,           थवा वैष्णवांचा नाचतसे... महिमा नामाचा सांगती सकला भेटण्या विठ्ठला धाव घेती...           आषाढी कार्तिकी सोहळा विठूचा,           गजर नामाचा चालतसे... वाळवंटी होई,काल्याचे किर्तन धाव घेई मन घराकडे...         __आरती डिंगोरे.✍

आषाढी स्पेशल, "रखुमाईच्या शेजारी" ! यवतमाळ हून अमृता खंडेराव !!

इमेज
आषाढी स्पेशल, "रखुमाईच्या शेजारी" !  यवतमाळ हून अमृता खंडेराव !!                      !! रखुमाईच्या शेजारी !! रखुमाईच्या शेजारी  उभा विठ्ठल सावळा ! साऱ्या भक्त भक्तिणींना त्याचा आडमाप लळा !!                  अशी घनदाट गर्दी                  लोटालोट भागाभाग !                  त्याच्या पायाशी सरती                   जगण्याचे सारे भोग !! भक्त लोटले अमाप प्राणवायू गा कोंडला ! रागावली रखुमाई श्वास तिचा अडकला !!                रखुमाईच्या शेजारी                राजा विठ्ठल सावळा !                त्याच्यासाठी जमा झाला                गणगोत गोतावळा !!          __अमृता खंडेराव.             यवतमाळ

नागपूरहून आषाढी स्पेशल, कवयित्री अनुपमा मुंजे यांची रचना "आम्ही वारकरी" !

इमेज
नागपूरहून आषाढी स्पेशल, कवयित्री अनुपमा मुंजे यांची रचना "आम्ही वारकरी" !           आम्ही वारकरी....🙏🙏 आम्ही वारकरी जातो या वारीस ! भेदा भेद वेस ओलांडतो !!             जनी सखू नामा             आम्ही सारे सखे !             विठु माय देखे             नित्य डोळा !! भेटी लागी जीवा सरो भेदाभेद ! मनाचे ते वेद एक होवो !!             जडो तुझे प्रेम             ओठी विठू नाम !             तुच निजधाम             बाप राया !! सरो पाप वृत्ती नित्य घडो सेवा ! पदी तुझ्या देवा प्राण माझे !!        __अनुपमा मुंजे             नागपूर

आषाढी स्पेशल- "पंढरीचे वारकरी" छत्रपती संभाजीनगर हून उद्धव भयवाळ यांनी न्यूज मसाला कडे पाठविलेली रचना !

इमेज
आषाढी स्पेशल- "पंढरीचे वारकरी" छत्रपती संभाजीनगर हून उद्धव भयवाळ यांनी न्यूज मसाला कडे पाठविलेली रचना !                 !! पंढरीचे वारकरी !! पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्ही चाललो पंढरपुरी ! पंढरीचे वारकरी हो   पंढरीचे वारकरी !! विठूनामाच्या गजरामध्ये तहान भूक ही हरवली ! विठ्ठलाच्या दर्शनाची आस आता हो लागली !! चंद्रभागेच्या तीरावरी जमेल भक्तांचा मेळा ! इच्छापूर्ती होईल, जेव्हा दर्शन देईल विठू सावळा !! पंढरपूरच्या वारीची किती वर्णावी महती ! विठुरायाच्या दर्शनाने चिंता संसाराच्या मिटती !!  उद्धव भयवाळ छत्रपती संभाजीनगर

कवयित्री अलका कुलकर्णी यांची आषाढी स्पेशल रचना "चंद्रभागे तिरी"

इमेज
कवयित्री अलका कुलकर्णी यांची आषाढी स्पेशल रचना "चंद्रभागे तिरी"                   चंद्रभागे तिरी... साजिरे सगुण रूप विठू सावळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा...! नाम घोष पांडुरंग वारी पंढरी वाजतो मृदंग आणि टाळ तुतारी ! झाले देहभान दंग लागला लळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !! आल्या स्वागतास पावसाच्या सरी  वारकरी नाचे धुंद तालावरी ! बहरला जणू सावत्याचा मळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !! भक्ती हेच कर्म आणि ध्यास अंतरी हरी भजनात दंग वारकरी ! भाळावर शोभतोय कस्तुरी टिळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !! दारी आले भक्त तू उभा विटेवरी ओढ लागली कधी दिसेल पंढरी ! खांद्यावर वीणा माळ तुळशी गळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !! आषाढीचे वेध मज लागले हरी पुण्य काही साठवावे मी परोपरी ! विठ्ठला मी तुझा वारकरी आगळा चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !! ©️🍁 *अलका कुलकर्णी* 🍁

जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार सोहळा तसेच शेतकरी मेळावा - सत्यजीत तांबे

इमेज
जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा शेतकरी पुरस्कार सोहळा तसेच शेतकरी मेळावा - सत्यजीत तांबे      नासिक ( प्रतिनिधी)::- मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोकचवळीच्या माध्यमातून शेतकरी पुरस्कार सोहळ्याचे लवकरच आयोजन करण्यात आल्याची माहिती आम. सत्यजित तांबे यांनी दिली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.          या पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.           देशात आजही सुमारे ५५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्