कवयित्री अलका कुलकर्णी यांची आषाढी स्पेशल रचना "चंद्रभागे तिरी"

कवयित्री अलका कुलकर्णी यांची आषाढी स्पेशल रचना "चंद्रभागे तिरी" 


                 चंद्रभागे तिरी...

साजिरे सगुण रूप विठू सावळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा...!

नाम घोष पांडुरंग वारी पंढरी
वाजतो मृदंग आणि टाळ तुतारी !
झाले देहभान दंग लागला लळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !!

आल्या स्वागतास पावसाच्या सरी 
वारकरी नाचे धुंद तालावरी !
बहरला जणू सावत्याचा मळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !!

भक्ती हेच कर्म आणि ध्यास अंतरी
हरी भजनात दंग वारकरी !
भाळावर शोभतोय कस्तुरी टिळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !!

दारी आले भक्त तू उभा विटेवरी
ओढ लागली कधी दिसेल पंढरी !
खांद्यावर वीणा माळ तुळशी गळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !!

आषाढीचे वेध मज लागले हरी
पुण्य काही साठवावे मी परोपरी !
विठ्ठला मी तुझा वारकरी आगळा
चंद्रभागे तिरी रंगलाय सोहळा... !!

©️🍁 *अलका कुलकर्णी* 🍁

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा १५वा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२६,

विवाहसंस्कृती की दिखाऊपणाचा बाजार ? समाज कोणत्या दिशेने चालला आहे./ दिखाव्याच्या स्पर्धेने उद्ध्वस्त होत चाललेला मध्यमवर्ग / उशिरा होणारे विवाह आणि अवास्तव अपेक्षा,,,,,,,,

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।