आषाढी स्पेशल, "आस" विठ्ठल दर्शनाची ! "झेंडा रोवला आता, सुटो ही देहगाथा . . .!" अनघा धोडपकर
आषाढी स्पेशल, "आस" विठ्ठल दर्शनाची ! "झेंडा रोवला आता, सुटो ही देहगाथा . . .!" अनघा धोडपकर 
नाचत गात आला हा वारकरी पंढरपुरी
 भक्तजनांनी साधली किमया अलंकापुरी
 नामाचा गजर वाहे भिमातीरी
 भजनाला रंग आला बहुअंतरी
 जल्लोशात आली दिंडी ही मनमंदिरी . . . . . . 
घेतला विसावा देखियला डोळा विठ्ठल 
 अंतरी दाटला सारा भाव कल्लोळ
 आनंदाने घेतली भेट नाम पायरीवरी . . . . 
करावा उध्दार हा भाव अर्पिला चरणी
 आस न राहिली मागे बोले करुणी
 झेंडा रोवला आता सुटो ही देहगाथा . . . . . 
           __अनघा धोडपकर...

 
Khup chan
उत्तर द्याहटवा