आषाढी स्पेशल (१४), उभा निवांत तू आत, विठ्या लाज नाही तुला !! अमृता खंडेराव

आषाढी स्पेशल (१४), उभा निवांत तू आत, विठ्या लाज नाही तुला !! अमृता खंडेराव


            !! पंढरी@आषाढी !!

दर्शनाची रेटारेटी
जागोजागी खेटाखेटी !
कोर्या लुगड्याचा वास
जीव झाला कासाविस !!
               पोटी कालवाकालव
               मन भक्तीमधी रंगे !
               भूक वरवर चढे
               पोटातल्या आम्लासंगे !!
अशा दाटल्या गर्दीत
धटिंगण मेला रेटे !
रांगमोड्या भाविकाला
देव सर्वाआधी भेटे !!
              लांब चालत मी आले
              चिंध्या जिवाच्या जाहल्या !
              उभा निवांत तू आत
              विठ्या लाज नाही तुला !!

        __अमृता खंडेराव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

परळी-वैजनाथ येथील राष्ट्रीय स्तरावरील भव्य पशुपक्षी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीला वेग !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।