नागपूरहून आषाढी स्पेशल, कवयित्री अनुपमा मुंजे यांची रचना "आम्ही वारकरी" !

नागपूरहून आषाढी स्पेशल, कवयित्री अनुपमा मुंजे यांची रचना "आम्ही वारकरी" !


          आम्ही वारकरी....🙏🙏

आम्ही वारकरी
जातो या वारीस !
भेदा भेद वेस
ओलांडतो !!
            जनी सखू नामा
            आम्ही सारे सखे !
            विठु माय देखे
            नित्य डोळा !!
भेटी लागी जीवा
सरो भेदाभेद !
मनाचे ते वेद
एक होवो !!
            जडो तुझे प्रेम
            ओठी विठू नाम !
            तुच निजधाम
            बाप राया !!
सरो पाप वृत्ती
नित्य घडो सेवा !
पदी तुझ्या देवा
प्राण माझे !!
       __अनुपमा मुंजे
            नागपूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !