पोस्ट्स

जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न !

इमेज
जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना  पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न !   नाशिक, दिनांक 30 जून 2023 (जिमाका वृत्तसेवा)::-  जिल्हा परिषदे तर्फे शाळा, केंद्र व तालुकास्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली होती. आज महाकवी कालिदास कलामंदिर येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.         यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भगवान फुलारी यांच्यासह जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.   पालकमंत्री यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा झाला सन्मान पहिला ग्रुप दर्शिका नरेश वानखेडे इयत्ता १ ली, जि.प.शाळा, दहिकुटे, मालेगाव गणेश

विशेष बालकांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले !

इमेज
विशेष बालकांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले !          नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष बालके अधिक संवेदनशील असतात. अशा बालकांच्या काढण्यात आलेल्या दिंडीत त्यांनी टाळ, मृदूंगाच्या ठेक्यावर ताल धरला. रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरमध्ये झालेल्या दिंडीने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.     आषाढी एकादिवशीच्या सकाळी दिंडीचे आयोजन करण्यात आले. छोट्या वारकऱ्यांचा सांप्रदायिक पोशाखातील उत्साह आकर्षित करीत होता. त्यांनी विठूरायाचा जयघोष करून परिसर दुमदुमून  टाकला. संस्थापिका व प्रमुख मार्गदर्शिका मोनिका गोडबोले - यशोद यांनी विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीचे  महत्व व विठोबाची गोष्ट सांगितली. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा नामघोष करीत दिंडीची सांगता झाली.

श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ची सामाजिक बांधिलकीतून अंध पालक पाल्यांना सालाबादप्रमाणे यंदाही मदतीचा हात ! डॉ. हेलन केलर यांची १४९ वी जयंती साजरी करण्यात आली

इमेज
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट ची सामाजिक बांधिलकीतून अंध पालक पाल्यांना सालाबादप्रमाणे यंदाही मदतीचा हात ! डॉ. हेलन केलर यांची १४९ वी जयंती  साजरी करण्यात आली      नासिक::- ओम  साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अँड डिसेबंल्ड आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने श्री साईबाबा हार्ट इनस्टिटूट या ठिकाणी गरजू अंध व्यक्तींच्या सामान्य मुलांना शैक्षणिक साहित्य नोटबुक, कंपास , बॉटल, दप्तर, आदि  वस्तूचे प्रमुख पाहुण्यांच हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर लेखिका सौ. विजयालक्ष्मी वैरागकर, ( मनेरीकर ) तसेच उद्योजिका मेघा गुप्ता, नाशिक बाजार समितीचे  उपसभापती उत्तम खांडबहाले, MSL Driveline Systems Limited चे जनरल मॅनेजर हेमंत राग उपस्थित होते.       प्रारंभी सर्व अतिथिंनी आदरणीय डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेचे पुजन करून अभिवादन केले. औपचारीक स्वागत करून पाहूण्यांनी  आपआपले मनोगत व्यक्त केले. या वेळी आपले विचार व्यक्त करताना सौ. वैरागकर यांनी संस्थेंच्या कार्याचे कौतुक करून या संस्थे सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून

आषाढी स्पेशल (२१), खास आषाढी एकादशी निमित्त गायक त्यागराज खाडीलकर, संगीतकार मनिषराज, गीतकार सुभाष सबनीस यांचे गीत !

इमेज
आषाढी स्पेशल (२१),  खास आषाढी एकादशी निमित्त गायक त्यागराज खाडीलकर, संगीतकार मनिषराज, गीतकार सुभाष सबनीस यांचे गीत ! सुभाष सबनीस यांचे सौजन्याने !

आषाढी स्पेशल (२०), वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा...वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा...वारी म्हणजे आनंदाचा सोहळा...दिलीप देशपांडे यांच्या "अवघे गरजे पंढरपूर" मधून सर्वांना विठूरायाचे मनोमन दर्शन घडावे !

इमेज
आषाढी स्पेशल (२०), वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा... वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा... वारी म्हणजे आनंदाचा सोहळा... दिलीप देशपांडे यांच्या "अवघे गरजे पंढरपूर" मधून सर्वांना विठूरायाचे मनोमन दर्शन घडावे ! ■ अवघे गरजे पंढरपूर.....|| जे विठ्ठलाचे भक्त असती ते येवोनी एक होती गावोनी भगवत् भक्ती विठ्ठलाचे नाम घेत उत्तम मार्गी चालती....               "वारी" म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांमधून निघून पंढरपूर येथे येणारी सामुदायिक विठ्ठल भक्तांची पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.  वारी म्हणजे विठ्ठलाचे भक्तीचा लळा... वारी म्हणजे वैष्णव भक्तांचा मेळा... वारी म्हणजे आनंदाचा सोहळा... आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. शेतकरी, कष्टकरी, महिला, असा सगळ्यांचा सहभाग वारीत असतो. गेल्य

आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग" नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी !

इमेज
आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग"  नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी  !          आषाढी एकादशी निमिताने-                  !! वारीचे अभंग !! वारीची हो वाट नसते बिकट दुष्कर जी वाट ती सहज ।। १ ।।             आली वारी वारी              चंद्रभागा तीरी             पाही वारकरी             पांडुरंगा ।। २ ।। रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जयघोष ।। ३ ।।            नाम ओठांवरी            भक्तीदीप अंतरी            जय हरी श्रीहरी            पांडुरंगा ।। ४ ।। विठ्ठला पाहुनी अश्रू हो लोचनी सुख मनोमनी म्या पामरा ।। ५ ।।                       __अरुण वि.देशपांडे                          पुणे

आषाढी स्पेशल (१८), डोईवर तुळस घेउन द्या की रं, आन् मला बी वारीला येउन द्या की !!रचनाकार सौ. अलका कोठावदे

इमेज
आषाढी स्पेशल (१८), डोईवर तुळस घेउन द्या की रं, आन् मला बी वारीला येउन द्या की !! रचनाकार सौ. अलका कोठावदे आषाढी एकादशी निमित्त एक रचना शिर्षकः मला बी वारीला ("मला बी जत्रला येऊंद्या कि रं" चालीवर ) डोईवर तुळस घेउन द्या की रं ! आन् मला बी वारीला येउन द्या की !! लई वाईट हा संसार,  लागे त्याचा जीवा घोर ! सुखदुःखाचा हा खेळ,  नाही कशाचा कशाला मेळ !!             जाऊ देवाला शरण,              घेऊ विसावा पायरीवर !             किती असार संसार,              मोक्षाची अडवितो वाट !! षड्रःरिपू मज गांजतात,  पाय विठूकडे धावतात ! नाम विठूचे घेऊन द्या कि रं, आन् मला बी वारीला येऊ द्या की ।१।             पळपळून सगळीकडे,              हाकतो संसाराचे गाडे !             पर संसार लई माजूर,              उभ्या अडचणी भरपूर !! ही भक्ती लई चतुर,  पहा येते कशी वेळेवर ! सार ईसरून जाऊन द्या की रं, आन् मला बी वारीला येऊन द्या की. ।२।            मी शरीराचा चाकूर,            किती पुरवावे त्याचे लाड !            त्रुष्णा माझी मालकिण,             सांगू किती आहे द्वाड !! उराउरी धावतो तरी,  तिचे भरेना रे पोट ! तिला

उपविभागीय अधिकारीने तब्बल ४० लाखांची लाच मागितली !

इमेज
उपविभागीय अधिकारीने तब्बल ४० लाखांची लाच मागितली ! नासिक::- उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वर्ग १, उपविभाग दिंडोरी येथील  डॉ. निलेश अपार यांस ४० लाख रुपयांची लाच मागितली होती व ती स्विकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.           यातील तक्रार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांचे कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगीं न घेतल्याने त्यांचे कंपनीस आलोसे यांचेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती ४० लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा .           सापळा अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस उप अधिक्षक, सापळा पथक पो.नि. संदिप साळुंखे, पो.हवा. डोंगरे, पो.हवा. इंगळे यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारव

आषाढी स्पेशल (१७), करा उद्धार जिवाचा, चला जाऊ पंढरीस ! सांगताहेत जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर

इमेज
आषाढी स्पेशल (१७), करा उद्धार जिवाचा, चला जाऊ पंढरीस ! सांगताहेत जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर                  ।।  वारकरी  ।।  करू चला पायी वारी  साऱ्या दुःखाना निवारी  मिळे माऊलीचा मान भाव वाढतो अंतरी।।१।।       संत सांगती वचन       सोडा संसाराची आस       करा उद्धार जिवाचा       चला जाऊ पंढरीस।। २।।  उभा आहे भिमातिरी  भाव भक्तीचा सागर  दोन्ही हाथ कटेवर  करी भक्तांचा उद्धार।। ३।।         करू नामाचा गजर         रूप पाहू विठ्ठलाचे         सांगू तयाला गाराने        धन धान्य आरोग्याचे।। ४।।  नका करू अनमान अहँकार करा कमी  पांडुरंग ठेवा मनी  मिळे सुखाची हो हमी।। ५।।         घरी दारी सारे गाऊ         वाट दावी ज्ञानेश्वरी        वाचू गीता भागवत         चला होऊ वारकरी।। ६।।    पुंजाजी (दादासाहेब) मालुंजकर 

आषाढी स्पेशल (१५), सौ. निर्मला भयवाळ, "धुंद होऊनी नाचतो वाळवंटी, आम्ही वारकरी" !

इमेज
  आषाढी स्पेशल (१५), सौ. निर्मला भयवाळ, "धुंद होऊनी नाचतो वाळवंटी, आम्ही वारकरी" !                    !!  वारकरी  !! आम्ही वारकरी, वारकरी करितो  पंढरीची  वारी !                 हाती टाळ मृदुंग                 मुखी विठ्ठलाचे नाव                 आम्ही वारकरी ! गात विठ्ठलाची गाणी क्रमितो वाट पंढरीची आम्ही वारकरी !                 खेळतो आम्ही जागोजागी                 फुगड्या, पावली आनंदाने                 आम्ही वारकरी ! जमतो सारे वाळवंटी घेउनी झेंडे, पताका हाती आम्ही वारकरी !                 मुखी विठ्ठल विठ्ठल गर्जत                 धुंद होऊनी नाचतो वाळवंटी                 आम्ही वारकरी !         __सौ. निर्मला भयवाळ             छत्रपती संभाजीनगर