आषाढी स्पेशल (१८), डोईवर तुळस घेउन द्या की रं, आन् मला बी वारीला येउन द्या की !!रचनाकार सौ. अलका कोठावदे

आषाढी स्पेशल (१८), डोईवर तुळस घेउन द्या की रं, आन् मला बी वारीला येउन द्या की !!
रचनाकार सौ. अलका कोठावदे

आषाढी एकादशी निमित्त एक रचना
शिर्षकः मला बी वारीला
("मला बी जत्रला येऊंद्या कि रं" चालीवर )


डोईवर तुळस घेउन द्या की रं !
आन् मला बी वारीला येउन द्या की !!
लई वाईट हा संसार, 
लागे त्याचा जीवा घोर !
सुखदुःखाचा हा खेळ, 
नाही कशाचा कशाला मेळ !!
            जाऊ देवाला शरण, 
            घेऊ विसावा पायरीवर !
            किती असार संसार, 
            मोक्षाची अडवितो वाट !!
षड्रःरिपू मज गांजतात, 
पाय विठूकडे धावतात !
नाम विठूचे घेऊन द्या कि रं,
आन् मला बी वारीला येऊ द्या की ।१।
            पळपळून सगळीकडे, 
            हाकतो संसाराचे गाडे !
            पर संसार लई माजूर, 
            उभ्या अडचणी भरपूर !!
ही भक्ती लई चतुर, 
पहा येते कशी वेळेवर !
सार ईसरून जाऊन द्या की रं,
आन् मला बी वारीला येऊन द्या की. ।२।
           मी शरीराचा चाकूर,
           किती पुरवावे त्याचे लाड !
           त्रुष्णा माझी मालकिण, 
           सांगू किती आहे द्वाड !!
उराउरी धावतो तरी, 
तिचे भरेना रे पोट !
तिला बी संग घेऊन द्या कि रं,
आन मला बी वारीला येऊन द्या की ।३।
          आपण बालपणीचं मैतर, 
          नका सोडू माझा हात !
          कस सांगू तुमच्याविना, 
          वासना करील माझा घात !
तुमच्यात सामिल होऊन द्या कि रं,
आन् मला बी वारीला येऊन द्या की ।४।
डोईवर तुळस घेऊन द्या कि रं !
आन् मला बी वारीला येऊन द्या की !!

            __सौ. अलका कोठावदे,
                    नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !