आषाढी स्पेशल (१७), करा उद्धार जिवाचा, चला जाऊ पंढरीस ! सांगताहेत जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर

आषाढी स्पेशल (१७), करा उद्धार जिवाचा, चला जाऊ पंढरीस ! सांगताहेत जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर 

                ।।  वारकरी  ।। 

करू चला पायी वारी 
साऱ्या दुःखाना निवारी 
मिळे माऊलीचा मान
भाव वाढतो अंतरी।।१।। 
     संत सांगती वचन 
     सोडा संसाराची आस 
     करा उद्धार जिवाचा 
     चला जाऊ पंढरीस।। २।। 
उभा आहे भिमातिरी 
भाव भक्तीचा सागर 
दोन्ही हाथ कटेवर 
करी भक्तांचा उद्धार।। ३।। 
       करू नामाचा गजर 
       रूप पाहू विठ्ठलाचे 
       सांगू तयाला गाराने
       धन धान्य आरोग्याचे।। ४।। 
नका करू अनमान
अहँकार करा कमी 
पांडुरंग ठेवा मनी 
मिळे सुखाची हो हमी।। ५।। 
       घरी दारी सारे गाऊ 
       वाट दावी ज्ञानेश्वरी
       वाचू गीता भागवत 
       चला होऊ वारकरी।। ६।। 

 पुंजाजी (दादासाहेब) मालुंजकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !