उपविभागीय अधिकारीने तब्बल ४० लाखांची लाच मागितली !

उपविभागीय अधिकारीने तब्बल ४० लाखांची लाच मागितली !

नासिक::- उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वर्ग १, उपविभाग दिंडोरी येथील  डॉ. निलेश अपार यांस ४० लाख रुपयांची लाच मागितली होती व ती स्विकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.

          यातील तक्रार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांचे कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगीं न घेतल्याने त्यांचे कंपनीस आलोसे यांचेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती ४० लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा .
          सापळा अधिकारी नरेंद्र पवार, पोलीस उप अधिक्षक, सापळा पथक पो.नि. संदिप साळुंखे, पो.हवा. डोंगरे, पो.हवा. इंगळे यांनी  श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !