विशेष बालकांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले !

विशेष बालकांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले !

         नाशिक ( प्रतिनिधी ) निरागस विशेष बालके अधिक संवेदनशील असतात. अशा बालकांच्या काढण्यात आलेल्या दिंडीत त्यांनी टाळ, मृदूंगाच्या ठेक्यावर ताल धरला. रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरमध्ये झालेल्या दिंडीने परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले.




    आषाढी एकादिवशीच्या सकाळी दिंडीचे आयोजन करण्यात आले. छोट्या वारकऱ्यांचा सांप्रदायिक पोशाखातील उत्साह आकर्षित करीत होता. त्यांनी विठूरायाचा जयघोष करून परिसर दुमदुमून  टाकला. संस्थापिका व प्रमुख मार्गदर्शिका मोनिका गोडबोले - यशोद

यांनी विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारीचे  महत्व व विठोबाची गोष्ट सांगितली. यावेळी अनुष्का यशोद, ऋतुजा ढोरे, लीना काळे, मयूर कारंडे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा नामघोष करीत दिंडीची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !