आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग" नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी !

आषाढी स्पेशल (१९), अरूण देशपांडे लिखित "वारीचे अभंग"  नाम ओठांवरी भक्तीदीप अंतरी  !


         आषाढी एकादशी निमिताने- 
                !! वारीचे अभंग !!

वारीची हो वाट
नसते बिकट
दुष्कर जी वाट
ती सहज ।। १ ।।
            आली वारी वारी 
            चंद्रभागा तीरी
            पाही वारकरी
            पांडुरंगा ।। २ ।।
रामकृष्ण हरी
पांडुरंग हरी
वासुदेव हरी
जयघोष ।। ३ ।।
           नाम ओठांवरी
           भक्तीदीप अंतरी
           जय हरी श्रीहरी
           पांडुरंगा ।। ४ ।।
विठ्ठला पाहुनी
अश्रू हो लोचनी
सुख मनोमनी
म्या पामरा ।। ५ ।।
       
             __अरुण वि.देशपांडे
                         पुणे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

सिडकोतील महिलांनी हेमंत गोडसे यांचे औक्षण करून दिल्या विजयीभव च्या शुभेच्छा !! तरुणांनी काढलेली मोटारसायकल रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत