पोस्ट्स

डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे ! स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये !

इमेज
डॉ. भारतीताई पवार, डॉ. सुभाष भामरे आणि कार्यसम्राट हेमंत गोडसे !  स्नेहभोजनाच्या पंक्ती रोजच उठविता येतील अन्यथा बाजार उठायची वाट बघणे धोक्याची घंटा ठरू नये ! न्यूज मसाला वृत्तसेवा, नासिक        खासदार भारतीताई पवार यांचा दोन लाखांच्या मताधिक्याने लोकसभेत प्रवेश झाला. लोकसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना मराठीतून केलेले भाषण आणि खासदार प्रीतम मुंढे व रक्षा खडसे यांना आलेले हसू याचा व्हायरल झालेला  व्हिडिओ काय दर्शवित होता हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळे भाव निर्माण करुन गेला. मात्र नासिक जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार होण्याचा मिळालेला मान उल्लेखनीयच म्हणावा लागेल. शिवाय राज्यमंत्री म्हणून शपथ घेणे यासाठी मुंढे आणि खडसे यांचे हसणे, दोन लाखांचे मताधिक्य, पहिल्या महिला खासदार, पाणीदार नेते ए. टी. पवार (दादासाहेब) यांच्या स्नुषा, जिल्हा परिषद सदस्य या कारकिर्दीचा तसेच उच्चशिक्षित यापैकी कशाचा निकष असेल ? काहीही असो, राज्यमंत्री होण्याचा मान प्राप्त होणे अभिनंदनीयच. यामुळे जिल्ह्यातील समस्त हितचिंतकांना आनंद तर होणारच आणि अपेक्षाही वाढणार यांत शंका नाही. या

जब झिरो दिया मेरे भारतने- सौजन्याने

जब झिरो दिया माझा भारताने- सौजन्याने 

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3

इमेज
चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3 पृथ्वीची ओसंडून वेस पाहिलास तू नवा देश ! प्रियकर, मामा इथे ख्याती डोलला अभिमानाचा शेष !! देव म्हणून तुज पूजले  ओव्या, आरतीत भजले ! नव्या युगाचे पाऊल नवे देशाचे कौतुक झाले !! इस्त्रो शास्त्रज्ञ कथा न्यारी छातीठोक अभिमान वारी ! पहिला वाहिला भारत देश  फडकवल्या तिरंगा लहरी !! आनंदाचे दरवळले अत्तर  डोंगर, दरी, कातळ, पत्थर ! दुमदुमली चंद्रयान 3 पांढरी सफल, यशस्वी इस्त्रोचा पत्कर !!   कल्पना मापूसकर, मीरारोड, ठाणे

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -१ विजयी विश्व तिरंगा आमुचा !

इमेज
चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -१ विजयी विश्व तिरंगा आमुचा ! विजयी विश्व तिरंगा आमुचा आज फडकला चंद्रावरती ! चांद्रयानाच्या यशस्वीतेने भारतीयांची फुलली छाती !! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कुणीच पोचू शकले नाही ! चांद्रयानाने ते करून दावले, ही आमच्या सामर्थ्याची ग्वाही !! भारत आमचा विश्र्वगुरू हा  ब्रह्मांडाला  घाली गवसणी ! वाटचाल ही असेल पुढची सूर्यमण्डल हे लक्ष्य ठेवुनी !!           उद्धव भयवाळ, छत्रपती संभाजीनगर,           २४/०८/२०२३

ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दलॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !

इमेज
ज्योतिषाच्या पुस्तक लेखनाबद्दल ॲड. मिलिंद चिंधडे यांचा सन्मान !         सातारा-नासिक::- ज्येष्ठ रमलतज्ञ आणि ग्रहांकितकार  चंद्रकांत शेवाळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुणे येथे आयोजित ४१ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन झाले त्यामध्ये पुस्तक लेखनाबद्दल मिलिंद चिंधडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.           सत्काराला उत्तर देताना "ज्योतिष नभातील तारे" हे एक ज्योतिष विषयातील आगळे वेगळे पुस्तक असल्याचे नमूद करून त्यामध्ये ५० ज्योतिषांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याचे मिलिंद चिंधडे म्हणाले.           भालचंद्र ज्योतिष विद्यालय पुणे आणि प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी सातारा यांच्यातर्फे आयोजित या अधिवेशनात तीसहून अधिक ज्योतीष संस्थांचे प्रतिनिधी आणि देशातील सुमारे १००० हून अधिक ज्योतिर्वीद सहभागी झाले होते.          अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध टॅरो ग्रंथ लेखिका ॲड. सुनिता पागे यांनी आणि स्वागताध्यक्षपद वास्तु ज्योतिषी ॲड. वैशाली अत्रे यांनी भूषविले. याप्रसंगी चंद्रकांत शेवाळे, सौ. पुष्पलता शेवाळे, राजेश वशिष्ठ, दिलीप अवस्थी, उल्हास पाटकर, प्रदीप पंडित, आप्पासाहेब नवले  इत्य

आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन !

इमेज
आचार्य अत्रे आणि समकालिन यांच्याविषयी नवी पिढीने वाचन करावे – भाऊ तोरसेकर आचार्य अत्रे यांना १२५ व्या जयंतीनी वरळीत अभिवादन ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)::- आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीदिनी वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भाऊ तोरसेकर, आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, विसुभाऊ बापट, अरविंद भोसले, शिबानी जोशी, ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री विजय वैद्य, योगेश त्रिवेदी, संतोष (आबा) माळकर, अशोक शिंदे, ह. मो. मराठे यांच्या कन्या श्रीमती पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.           दरवर्षी काकासाहेब पुरंदरे यांच्या नावाने दिला जाणारा १३ वा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना समितीच्या वतीने आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी जाहीर केला. त्याचे वितरण २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शानदार समारंभात होणार आहे.          आचार्य अत्रे यांचे ज्यांच्याशी वाद झाले, मैत्री झाली, अशा समकालि

लाच स्वीकारताना लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लाच स्वीकारताना लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !    नासिक/जळगाव::- चाळीसगाव तहसील कार्यालयातील फौजदारी लिपिक दीपक बाबूराव जोंधळे यांस लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.            तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी लिपिक दीपक जोंधळे याने २५९० /- रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. आलोसे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.            सापळा अधिकारी अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, सापळा पथक पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथक यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, माधव रेड्ड

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम !

इमेज
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम !             पालघर   ( जिमाका) :   आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण ,  मानवतेबद्दल असीम श्रध्दा ,  निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ९ ऑगस्ट हा "जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस राज्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.             जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आज बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता राजीव गांधी मैदान जव्हार ,  ता. जव्हार जि. पालघर येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री ,  उपमुख्यमंत्री ,  इतर मान्यवर उपस्थ‍ित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव

दुसऱ्या लोकचित्र संगम कलामहोत्सव चित्रप्रदर्शनाचे आज उदघाट्न !

इमेज
दुसऱ्या लोकचित्र संगम कलामहोत्सव चित्रप्रदर्शनाचे आज उदघाट्न ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801         नाशिक ( प्रतिनिधी ) - वारली आर्ट फाउंडेशनतर्फे लोकचित्र संगम कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच दि. १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हा अनोखा उपक्रम नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ शोरूममधील कलादालनात सुरु झाला आहे. त्यात भारतातील विविध वैशिष्ट्यपूर्ण लोकचित्र शैलीतील आकर्षक कलाकृतींचा समावेश असून एकूण २५ कलाकार सहभागी होणार आहेत. प्रत्येक आठवड्याला ६ कलाकार त्यांची चित्रे प्रदर्शित करतील. संकल्पना व संयोजन पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांचे आहे. या मालिकेतील दुसऱ्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न आज (दि. ९) होणार आहे.     सायंकाळी ५ वाजता या लोकचित्र संगम कलामहोत्सवातील चित्रप्रदर्शनाचा उदघाट्न समारंभ होईल. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, ज्येष्ठ चित्रकर्ती मुक्ता बालिगा, चित्रकार व कलादिग्दर्शक आनंद ढाकीफळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. पहिल्या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चांगली चित्रविक्री होत आहे. दि.९ त

सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन !

इमेज
सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन ! न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक, 7387333801,            मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : केदारनाथ शाळा नेहरूनगर कुर्ला पूर्व येथे संकल्प संस्था आणि मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २०२३' चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन केदारनाथ शाळेचे अध्यक्ष विनय रानडे आणि प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटक सविता कुराडे (अधिक्षिका, आशा सदन बालिकाश्रम, डोंगरी, मुंबई) यांच्या हस्ते तसेच या प्रशिक्षण शिबिराचे आयोजक विनोद हिवाळे अध्यक्ष संकल्प संस्था आणि सूरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था यांच्या उपस्थितीत पार पडला.           विनोद हिवाळे यांनी शिबिराची प्रस्तावना केली. पहिल्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा मुख्य हेतू सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यकर्ता घडवणे, त्या कार्यकर्त्याला समाजातले सामाजिक प्रश्न काय आहेत याची जाणीव करून देणे, ते प्रश्न सोडवताना सामाजिक कार्यकर्ता म्हणून कुठले गुण असावेत, कार्यकर्त्याचे तत्व काय आहे, मूल्य काय आहे, कार्यकर्ता म्हणून कोणते संविधानि