मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम !


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम !

            पालघर (जिमाका) : आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणमानवतेबद्दल असीम श्रध्दानिसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ९ ऑगस्ट हा "जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस राज्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.


            जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आज बुधवार दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता राजीव गांधी मैदान जव्हारता. जव्हार जि. पालघर येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्रीइतर मान्यवर उपस्थ‍ित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

          कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असलेला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उपस्थ‍ित राहण्याबाबत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पडहाणू व जव्हार जि. पालघर यांनी आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !