चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -२ Good luck चंद्रयान 3

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !!
कविता -२

Good luck चंद्रयान 3

पृथ्वीची ओसंडून वेस
पाहिलास तू नवा देश !
प्रियकर, मामा इथे ख्याती
डोलला अभिमानाचा शेष !!

देव म्हणून तुज पूजले 
ओव्या, आरतीत भजले !
नव्या युगाचे पाऊल नवे
देशाचे कौतुक झाले !!

इस्त्रो शास्त्रज्ञ कथा न्यारी
छातीठोक अभिमान वारी !
पहिला वाहिला भारत देश 
फडकवल्या तिरंगा लहरी !!

आनंदाचे दरवळले अत्तर 
डोंगर, दरी, कातळ, पत्थर !
दुमदुमली चंद्रयान 3 पांढरी
सफल, यशस्वी इस्त्रोचा पत्कर !!
 
कल्पना मापूसकर,
मीरारोड, ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

न्यूज मसाला प्रकाशित वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांच्या लेखमालेवर विविध मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया !! सर्वदूर पोहचलेले, मान्यवरांनी गौरविलेले, नासिकमधून प्रकाशित होणारे साप्ताहिक न्यूज मसाला !!!

नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!