दुसऱ्या लोकचित्र संगम कलामहोत्सव चित्रप्रदर्शनाचे आज उदघाट्न !

दुसऱ्या लोकचित्र संगम कलामहोत्सव चित्रप्रदर्शनाचे आज उदघाट्न !

न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक
7387333801
        नाशिक ( प्रतिनिधी ) - वारली आर्ट फाउंडेशनतर्फे लोकचित्र संगम कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात प्रथमच दि. १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान हा अनोखा उपक्रम नाशिकरोडच्या पु. ना. गाडगीळ शोरूममधील कलादालनात सुरु झाला आहे. त्यात भारतातील विविध वैशिष्ट्यपूर्ण लोकचित्र शैलीतील आकर्षक कलाकृतींचा समावेश असून एकूण २५ कलाकार सहभागी होणार आहेत. प्रत्येक आठवड्याला ६ कलाकार त्यांची चित्रे प्रदर्शित करतील. संकल्पना व संयोजन पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांचे आहे. या मालिकेतील दुसऱ्या चित्रप्रदर्शनाचे उदघाट्न आज (दि. ९) होणार आहे.

    सायंकाळी ५ वाजता या लोकचित्र संगम कलामहोत्सवातील चित्रप्रदर्शनाचा उदघाट्न समारंभ होईल. क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, ज्येष्ठ चित्रकर्ती मुक्ता बालिगा, चित्रकार व कलादिग्दर्शक आनंद ढाकीफळे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. पहिल्या प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चांगली चित्रविक्री होत आहे. दि.९ ते १६ दरम्यान श्रद्धा शेतकर, कविता बरवे, शिल्पा भाटिया, श्वेता गरे, नेहा बरवे, मनीषा अग्रवाल, सायली झांबरे आणि संजय देवधर यांची विविध राज्यांच्या शैलीतील सुंदर चित्रे बघायला मिळतील. 
   दि. १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान तिसऱ्या प्रदर्शनात अपूर्वा भंडारे, सुप्रिया जोशी, देविका काशीकर, स्नेहल बंकापुरे, आदिती पळसुले आणि दि.२४ ते ३१ ऑगस्ट या चौथ्या व शेवटच्या प्रदर्शनात पद्मजा ओतूरकर, माधवी पाठक, श्रद्धा रावळ, निवेदिता पोतदार व स्मिता गांगल यांच्या चित्रांचा समावेश असेल. हा संपूर्ण कलामहोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कलारसिकांनी चित्रप्रदर्शनाला उपस्थित राहून कलाकृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक संजय देवधर व सर्व सहभागी कलाकारांनी केले आहे. 
 ‌************************************
विविध लोकचित्रशैलींची रसिकांना मेजवानी
            
          महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली सुपरिचित आहे. त्या खालोखाल बिहारची मधुबनी कला रसिकांना माहिती आहे. पण फारश्या माहिती नसणाऱ्या चित्रकथी,‌ लिपण, टिकुली, साओरा, गोंड, पट्टचित्र, मांडणा, फड, गुर्जरी, कलमकारी, पिछवाई, मंडला, भिल्ल, हजारीबाग, संथाळ, धुलीशिल्प, लेदर पपेट्री अशा विविध प्रांतांच्या लोकचित्र शैलींचा संगम एकाच छताखाली झालेला बघायला मिळेल. नाशिककर कलारसिकांसाठी ही अपूर्व मेजवानी आहे. येथे चित्रे अल्पदरात खरेदीही करता येतील.
*************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !