चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !! कविता -१ विजयी विश्व तिरंगा आमुचा !

चांद्रयान ३ - भारत विश्वगुरू वाटचाल !!
कविता -१

विजयी विश्व तिरंगा आमुचा !

विजयी विश्व तिरंगा आमुचा
आज फडकला चंद्रावरती !
चांद्रयानाच्या यशस्वीतेने
भारतीयांची फुलली छाती !!

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर
कुणीच पोचू शकले नाही !
चांद्रयानाने ते करून दावले,
ही आमच्या सामर्थ्याची ग्वाही !!

भारत आमचा विश्र्वगुरू हा
 ब्रह्मांडाला  घाली गवसणी !
वाटचाल ही असेल पुढची
सूर्यमण्डल हे लक्ष्य ठेवुनी !!

          उद्धव भयवाळ, छत्रपती संभाजीनगर,
          २४/०८/२०२३


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आश्रम शाळा मुख्याध्यापक रक्कम टाकून पळून गेले !

वर्ग एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

जिल्हा आरोग्य अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !