पोस्ट्स

"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने स्नेहमेळावा स्वरसुगंधित !

इमेज
"होशवालों को खबर क्या,,,,,,,,!" सुरेल संगीत मैफलीने  स्नेहमेळावा स्वरसुगंधित !        नाशिक ( प्रतिनिधी)  बडी नाजूक है ये मंझिल..., होशवालो को खबर क्या..., जिंदगी जब भी तेरी याद..., बडी खूबसूरत वो..., मजा लेना है..., हंगामा है बरका... तेरी आंखो के दरिया मे..., तेरे रशके कमर...,या व अश्या गाण्यांची मेजवानी गायक कलाकारांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना दिली. सुप्रसिद्ध गायक संजय वत्सल ( बानुबाकोडे), त्यांच्या पत्नी संज्योत व पुत्र श्लोक यांनी सुरेल गाणी सादर करुन वन्समोअर मिळवले. विविध गझल, गाजलेली हिंदी चित्रपट गाणी यांनी स्नेहमेळावा स्वरसुगंधित झाला.    पेठे विद्यालयातील १९७५ एसएससी बॅचच्या मित्रांचा स्नेहमेळावा ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक संजीव आडगांवकर यांनी आयोजित केला. हॉटेल पाल्म शेलच्या हिरवळीवर  झालेल्या कार्यक्रमाला ६० पेक्षा जास्त मित्र उपस्थित होते. तबल्यावर विजय खिस्ती यांनी तर सिन्थेसायझरवर गौरव काळगे यांनी सुरेल साथसंगत केली. मध्यंतरात घनश्याम पटेल यांनी बदन पे सितारे लपेटे हुए... या गायलेल्या गाण्यावर सर्वांनी ताल धरत नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. संजीव आडगांवकर यांचा

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !

इमेज
दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार !           मुंबई::- आज दि. १६ रोजी दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार !             ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज चांगली बळकटी मिळाली. दावोस येथे आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.              यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही कंपनी अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्र मध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. या संदर्भात महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी जै

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप !

इमेज
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप !     नासिक::- मागील १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२४ या पाच दिवसापासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभात महायुवा ग्राम हनुमान नगर मधील रंगारंग कार्यक्रमाने झाला.             देशभरातील सुमारे आठ हजार युवकांनी युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय महोत्सवात सहभाग घेतला. नेहरू युवा केंद्र संघ आणि एनएसएस च्या स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम करून हा महोत्सव यशस्वी करण्यात मदत केली. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक शहरात प्रथमच आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा योग सोळा वर्षानंतर जुळून आला. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची यानिमित्ताने पुन्हा एकदा संधी मिळाली. आज १६ जानेवारी रोजी झालेल्या समारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली

हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !

नाशिक शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतूदींचे पालन करावे !                                                                            नाशिक, दिनांक (जिमाका वृत्तसेवा)::-  नाशिक शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी येणाऱ्या अभ्यांगतांची शहरातील विविध हॉटेल्समध्ये निवास व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने नाशिक कार्यालयात कार्यरत अन्न सुरक्षा अधिकारी यांची आवश्यकतेनुसार अन्न नमुने तपासणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यादृष्टीने शहरातील हॉटेल व्यावसायिक यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा तरतुदींचे पालक करावे, असे आवहन सं.भा. नारागुडे, सह आयुक्त (नाशिक विभाग) अन्न व औषध प्रशासन यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.           राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते होणार आहे, या महोत्सावासाठी येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील विविध हॉटेल्ससह महायुवाग्राम, हनुमाननगर तपोवन, पंचवटी, उधोजी महाराज वास्तू संग्रहायल मैदान, के.टी.एच.एम कॉलेजजवळ आणि  महाकवी कालिदास कलामंदिर मैदान येथे मध्यवर्ती

लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

इमेज
लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !        नासिक/जळगाव::- आलोसे प्रशांत विकास जगताप, (कंत्राटी वायरमन) जळगांव जि.जळगांव याने १६००००/- लाचेची मागणी केली होती, त्यातील १०००००/- रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ताब्यात घेण्यात आले.    यातील तक्रारदार यांचे घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांव च्या पथकाने भेट दिली होती. सदर भेटीनंतर त्यांना आता चार लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती एक लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष एक लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंग

पाणी मागणी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत !

इमेज
शेतकऱ्यांनी १४ जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत !        नाशिक (जिमाका वृत्तसेवा)::- मालेगाव पाटबंधारे विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील पाटबंधारे उपविभाग सटाणा अंतर्गत असलेले लघु प्रकल्प पठावे, दसाणे, जोखाड यांचे जलाशय व नदीवरील मंजूर उपसा सिंचन व कालवा प्रवाही तसेच कालव्यावरील मंजुर उपसा सिंचन द्वारे पाणी पुरवठा करणेसाठी  शेतकऱ्यांनी १४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत असे आवाहन  कार्यकारी अभियंता, मालेगाव पाटबंधारे विभाग म.नं डोके यांनी केले आहे.        रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये पिण्यासाठी आरक्षित पाण्या व्यतिरिक्त उपलब्ध पाण्यातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन देण्याचे नियोजन संबंधित कालावा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. संबंधित लघु प्रकल्पांमधील सिंचनासाठी उपलब्ध होणारा पाणीसाठा विचारात घेवून रब्बी हंगामात पेरणी झालेली पिके व उभ्या पिकांना हंगामी पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन आहे.         वरील प्रमाणे करण्यात येणारा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र शासन सिंचन कायदा सन १९७६ व महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुद

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !

इमेज
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानातंर्गत विविध योजनांचे शिबीर संपन्न !                                                                                 नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत इगतपूरी, पेठ व त्र्यंबकेश्वर येथे विविध योजनांच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून  लाभार्थ्यांना मोठया प्रमाणात लाभ देण्यात येत असून विविध योजनांचे प्रमाणपत्र व कार्ड वितरीत करण्यात आले आहे, असे नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.           या शिबीरात जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विविध योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच  प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियांतनर्गत लाभार्थ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड, प्रधानमंत्री उज्वला योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री विश्वकर्मा, जनधन योजन

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांचे आवाहन !

इमेज
माजी सैनिकांनी पेंशन, इसीएचएस व सीएसडी कँटीन विषयी अडचणींबाबत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !                                     नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- रक्षा लेखा प्रधान नियंत्रण कार्यालय, अलाहाबाद आणि दक्षिणी कमान, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी  सैनिक, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, विधवा यांच्या पेंशन, इसीएचएस (ECHS) व कँटीन याविषयीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फेब्रुवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे येथे पेंशन अदालत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने ज्या माजी  सैनिकांच्या अडचणी असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

अवलिया युवा कलाशिक्षक प्रदीप शिंदे !

इमेज
पळसे येथील नासाका माध्यमिक विद्यालयाचे युवा कलाशिक्षक प्रदीप भाऊसाहेब शिंदे (86056 57132) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपळपानावर रेखाटलेल्या प्रतिमा. 

'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!

इमेज
'मायबाप' ने जागवल्या मातेच्या आठवणी ! 'मह्या मायपुढं थिटं, सम्दं देऊळ राऊळ...तिच्या पायाच्या चिऱ्यात, माह्य अजिंठा वेरूळ' !!      न्यूज मसाला वृत्तसेवा नासिक 7387333801        कळवण::- कवी अशोक बुरबुरे यांच्या कवितेसह अनेक कविता सादर करत आईच्या आठवणींचा जागर कळवणच्या आप्पाश्री लॉन्समध्ये रंगला. निमित्त होतं सेवानिवृत्त मुख्याध्यापिका लीलाबाई दिनकर गरुड यांच्या प्रथम स्मृतिदिनाचं. महाराष्ट्राभर गाजत असलेल्या अरुणराज प्रस्तुत 'मायबाप' च्या १८९ व्या प्रयोगातून मातेच्या स्मृतींना अनोखे अभिवादन करण्यात आले.       कवी आणि सादरकर्ते राजेंद्र उगले, अरुण इंगळे यांनी रसिकांसमोर मायबापाची एक-एक आठवण हळुवारपणे मोकळी करत रसिकांच्या डोळ्यात पाणी उभे केले.    'नाही घातलीस माळ, नाही लावियेला टिळा   माझ्या मायमाऊलीचा, भक्तिमार्ग साधाभोळा !' असे म्हणत कवी राजेंद्र उगले यांनी संसारात रमलेल्या पण मुलांच्या संगोपनात घरालाच मंदिर मानणाऱ्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर कवी अरुण इंगळे यांनी संस्कारांची शिदोरी देणाऱ्या आपल्या वडिलांचं मोठेपण मांडताना-   'श्रीमंती मनाच