जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांचे आवाहन !

माजी सैनिकांनी पेंशन, इसीएचएस व सीएसडी कँटीन विषयी अडचणींबाबत १५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !   

 
                        
      नाशिक, दिनांक : १० जानेवारी २०२४ (जिमाका वृत्तसेवा)::- रक्षा लेखा प्रधान नियंत्रण कार्यालय, अलाहाबाद आणि दक्षिणी कमान, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी  सैनिक, माजी सैनिक वीरमाता, वीरपत्नी, विधवा यांच्या पेंशन, इसीएचएस (ECHS) व कँटीन याविषयीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फेब्रुवारी २०२४ च्या दुसऱ्या आठवड्यात पुणे येथे पेंशन अदालत घेण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने ज्या माजी  सैनिकांच्या अडचणी असतील त्यांनी सर्व कागदपत्रांसह १५ जानेवारीपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर ओंकार कापले (निवृत्त) यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

जि. प. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेला वेग; आणखी ५ कर्मचाऱ्यांचे निलंबन, आतापर्यंत एकूण २८ कर्मचाऱ्यांवर कारवाई

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद