लोकअदालतीत १३ हजार २०४ प्रकरणे निघाली निकाली; तब्बल १२३ कोटींवर तडजोड शुल्क वसूल नाशिक::- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यात १३ सप्टेंबर, २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातून एकूण १३ हजार २०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे १२३ कोटी ८८ लाख ८६ हजार ९६५ रूपये तडजोड शुक्ल म्हणून वसूल करण्यात आले असून, एक चाळीस वर्षांपूर्वीचा दावा निकाली निघाला आहे. अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुहास भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांवर करण्यात आली तडजोड मोटार अपघात प्रकरणात एकूण २५२ लाख रूपयांची तडजोड मोटार अपघात प्रकरणात २०१९ साली राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रक मध्ये झालेल्या अपघात बसमधील प्रवाशाचा मृत्यू झाला होता. सदर अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होवून मयताच्या वारसास रक्कम रूपये ९२ लाख इतकी नुक...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा