२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप !

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा रंगारंग कार्यक्रमाने समारोप ! 

   नासिक::- मागील १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०२४ या पाच दिवसापासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या समारोप समारंभात महायुवा ग्राम हनुमान नगर मधील रंगारंग कार्यक्रमाने झाला. 

           देशभरातील सुमारे आठ हजार युवकांनी युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय महोत्सवात सहभाग घेतला. नेहरू युवा केंद्र संघ आणि एनएसएस च्या स्वयंसेवकांनी कठोर परिश्रम करून हा महोत्सव यशस्वी करण्यात मदत केली. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक शहरात प्रथमच आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा योग सोळा वर्षानंतर जुळून आला. महाराष्ट्र सरकारला राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची यानिमित्ताने पुन्हा एकदा संधी मिळाली.

आज १६ जानेवारी रोजी झालेल्या समारंभ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा सचिव सुहास दिवसे यांच्यासह खासदार आमदार उपस्थित होते. महोत्सवामध्ये नाशिक शहरात देशभरातून आलेले युवकांनी कलात्मक प्रतिभेचा अनुभव दिला. त्याचवेळी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री निशित प्रमाणिक यांनी राष्ट्रीय युवा पुरस्काराने १५ तरुणांचा सन्मान केला. यांसह सांस्कृतिक कार्यक्रम, पोस्टर्सची कामगिरी, लोक  गाणी आणि लोकनृत्य महाकवी कालिदास कला मंदिर आणि उदोजी मराठा महाराज संग्रहालय, व रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महा युवा गाव हनुमान नगर येथे युवा कृती प्रदर्शन झाले. या प्रदर्शनात देशभरातील घरगुती उत्पादने सादर केली गेली आणि लोकांनी ती मनसोक्तपणे खरेदी केली. महाएक्सपो प्रदर्शनात राज्यातील तरुणांनी त्यांची प्रतिभा दाखवत विशेषता त्यांचे तांत्रिक शोधांचे प्रबंध/ प्रात्यक्षिके सादर केली. या उत्सवात तरुणांना चर्चा करण्याची संधी मिळाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींच्या सहकार्याने सुविचार संमेलनाने तरुणांना प्रेरणा दिली. देशभरातील तरुण कलाकारांनी प्रत्येकाला त्यांच्या कलेने प्रेरित केले आणि युवा महोत्सवाने स्थानिक नासिक कर नागरिकांना एक आनंददायी अनुभवाची अनुभूती मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !